रजत महोत्सवी जीवन विद्या वार्षिक संमेलन: ३ ते ५ फेब्रुवारी 2023 कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण

रजत महोत्सवी जीवन विद्या वार्षिक संमेलन: ३ ते ५ फेब्रुवारी 2023 कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर; जीवन विद्या (मध्यस्थ दर्शन सह अस्तित्व वाद ,प्रणिता : श्री ए नागराज जी) पर आधारित परिचयात्मक सत्र वरिष्ठ प्रबोधक श्री सोम त्यागी द्वारा वनामती सभागृहात 18 तारखेला दुपारी संपन्न झाले. यामध्ये सुमारे पाचशे लोकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात कुहू कलोडे यांच्या प्रास्ताविकांनी झाली. त्यामध्ये देशभरात चाललेले शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात चाललेल्याजीवन विद्या आधारित विविध कार्यक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी प्रबोधक श्री. सोम त्यागीजींचा परिचय दिला. नागपूर तर्फे माननीय श्री संतोष अग्रवाल आणि श्री संजय अरोरा जी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री सोमजींचे स्वागत केले.

आपल्या प्रबोधनात श्री सोम भाईंनी माणसाच्या आवश्यकतांचे स्त्रोत आणि मानव लक्ष्य यावर चर्चा करीत, प्रत्येक मानव मूलतः निरंतर सुखी होऊ इच्छितो याकडे लक्ष वेधले. पण या निरंतर इच्छे च्या पूर्तीसाठी मात्र परिवर्तनशील वस्तू जसे की रूप, पद, बल आणि धन यांचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो, आणि दुःख ओढवून घेतो. प्रत्येक माणूस २४x७ कुठल्यातरी भाव आणि विचारांसोबत असतो. कालच्या कार्यक्रमात या दोन्ही शब्दांची परिभाषा सभेत सहभागी श्रोत्यांसोबत संवाद करीत सोम भैय्यांनी केली .

याच विषयावर जीवन विद्या शिबिर 15 जानेवारी ते 21 जानेवारी याच वनामती हॉलमध्ये होणार आहे अशी सूचना देण्यात आली आणि लोकांनी त्यात आपली नावे रजिस्टर केली. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात माननीय श्री सोमभाई द्वारा रजत महोत्सवी वार्षिक जीवन विद्या संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. श्री अशोक बाहेती आणि श्री हेमंत मोहरीर (आयोजन समिती सदस्य नागपूर), यांचे द्वारा संमेलन कार्यक्रमाची माहिती सर्व सहभागींना दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles