म.रा.प्राथ.शिक्षक संघाचे उद्या जिल्हास्तरीय अधिवेशन

म.रा.प्राथ.शिक्षक संघाचे उद्या जिल्हास्तरीय अधिवेशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शिक्षक कर्मचारी वर्गाने अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन_

वर्धा: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा वर्धाचे जिल्हास्तरीय अधिवेशन व शिक्षण परिषद उद्या रविवार दि.25 डिसेंबर 2022 रोजी महात्मा पॅलेस,व्हि.आय. पी.रोड,गोपुरी चौक,वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून, सकाळी 10.30 वा. शिक्षण परिषदेत
मा.प्रा. दिलीप सोळंके,औरंगाबाद यांचे ‘शिक्षणाचा अर्थ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. आयोजित अधिवेशनास मुख्य अतिथी मा. दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, उद्घाटक खा. रामदास तडस, मुख्य अतिथी मा. गिरीष महाजन, ग्रामविकास मंत्री, अध्यक्ष अ.भा.प्रा.शि.सं. मा. माधवराव पाटील आणि स्वागताध्यक्ष आ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहे.

म.रा.प्राथ.शिक्षक संघ, वर्धा जिल्हा सदैव शिक्षकांच्या हक्क आणि मागण्यासाठी कार्यतत्पर आहे.अन्यायाविरुद्ध वेळीच गंभीरतेने सजग राहून जिल्हा प्रशासन व शासनासोबत शिक्षक संघ प्रतिनिधी लढा देत आहे. ही सर्व कार्यतत्परता आपल्या सर्वांच्या विश्वासाचे बळ आहे. संघटना प्रतिनिधी वेळोवेळी आपली भूमिका बजावत आहे.परंतु आपल्या न्याय मागण्या किमान त्रैवार्षिक स्थितीत संघटीत जनाक्रोशच्या माध्यमाने शासन, प्रशासन दरबारी पोहचविणे आवश्यक असते यास्तव अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र येणे आवश्यक आहे.

उद्या दि.25 डिसेंबर रोजी होत असलेले जिल्हा अधिवेशन हे शिक्षकांच्या संघटीत शक्तीचे माध्यम आहे. या माध्यमातून न्याय मागण्यांचा गजर शासन प्रशासनातील व्यक्तित्वा समोर करायचा आहे. तेंव्हा संघटीत अस्तित्वासाठी होत असलेल्या अधिवेशनात शिक्षक कर्मचारी यांनी कर्तव्यभावनेने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन म.रा.प्राथ.शिक्षक संघ, वर्धा जिल्हातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles