‘ओबडधोबड शिंपल्याच्या अंतरंगातही मोती असतोच’; स्वाती मराडे

‘ओबडधोबड शिंपल्याच्या अंतरंगातही मोती असतोच’; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘कवडीमोल जगणं नाही तुझं
झटकून टाक तू अविचार
ओळख तू स्व अस्तित्वाला
आहेस मोत्यासम तू चमकदार..!’

माझ्या प्रिय बाळा.. तू स्वतःला असे कमी का लेखतोस? नसतील तुझ्याकडे परीक्षेचे गुण, नसतील यशाचे चढते आलेख. पण आहेत तुझ्याकडे अनमोल गुण अनेक. जिद्द, मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा यांची पुटं चढवशील तर मोत्यासम तू चमकशील. खात्री आहे मला, ‘मोत्यासम तू’ चमकशील. ब-याच वेळा केवळ बाह्य दिसण्यावरून एखाद्याची योग्यता ठरवली जाते. पण ओबडधोबड शिंपल्याच्या अंतरंगातही मोती असतोच नाही का..!

तृणपात्यावर दव होऊन
रूपेरी उन्हात बसावं
क्षणभंगुर अस्तित्वातही
मोत्यासम तू… चमकावं..!

‘किती वर्ष जगला, यापेक्षा तो कसा जगला’, याला असतं महत्व.. जगणंच सांगतं जीवनाचं तत्व..क्षणातही जगावं सोडून मागे अस्तित्व. मग तो इवलासा पाण्याचा थेंबही मोती होऊन जगतो. घटकेच्या जगण्यातही जणू आकाश व्यापतो. खरंच जगणं असावं तर असं..!

बंदिस्त जरी जगणं नारी
तू सिद्ध केलंस स्वतःला
मोत्यासम तू.. घेतलीस झळाळी
ओलांडून शिंपल्याच्या उंबरठ्याला..!

पिढ्यानपिढ्या तुला माहिती नव्हतं मोकळं आकाश. होतेच आवळलेले भवताली पाश. घेतला नाही तू मोकळा श्वास. तरीही जपलंस तू तुझ्या गुणांना खास.. फुलवलेस तू त्यांना मिळताच अवकाश.. फोडलंस तू कवच शिंपल्याचं अन् टाकलेस पाऊल बाहेर. होता मनी विश्वास मोत्यासम तू चमकणार.. दिलास जगण्याला अर्थ अन् ठरविलास स्व विश्वास सार्थ. शिंपल्यात जणू बंदिस्त असूनही तिचं तेजस्वीपण वाढतच जावं.. त्याप्रमाणे तिने स्वतःची प्रगती केलीय. खरंच ती मोत्यासम चमकतेय.

आसवांनी छळले
येता दाटून मनात आभुट
अश्रू जरी…मोत्यासम तू
वाहे ओलांडून पापणीचा तट..!

कधी दाटतं मनात आभाळ.. लागते दोन्ही नेत्रांना गळ.. वाहत नीर येई गाली ओघळ.. कधी. सुखावतो ऊर.. क्षमतं काहूर.. थांबतो तेव्हा आसवांचा छळ.. प्रिय व्यक्तीच्या कुशीत जेव्हा जीव विसावतो.. तेव्हा अश्रूंनाही मोत्यांचा भाव येतो.. असे अश्रू जरी तू.. भासे मोत्यासम तू..!

मोत्यासम तू तेजस्वी
मी गं शिंपला खडकाळ
तू सागराच्या गाभा-यात
मी किनारी रानोमाळ..!

तू माझी प्रिय सखी.. पण कुठल्याच बाबतीत आपला ताळमेळ नाही. तू तेजस्वी.. मनमोहिनी.. पित्याची लाडकी.. त्याच्या हृदयगाभारी राहणारी.. मी मात्र शिंपल्यासारखा ओबडधोबड दूर कुठेतरी किना-यावर भटकणारा.. असे असले तरी तुला जिवापाड जपणारा.. तुझ्या अस्तित्वाला झळाळी देणारा.. नित्य तुला काळजात साठवणारा..तसेतर एकमेकांशिवाय आपले अस्तित्व नाहीच.. असेच मोत्यासम तू शीतल मनाचे असावे. मी तुला मनापासून जपावे.

चित्र चारोळी स्पर्धेसाठी ‘मोत्यासम तू’ हा विषय आला अन् मोत्याची अनेक रूपे नजरेसमोर आली. तसे पाहिले तर निसर्गात अनेक चमत्कार पहायला मिळतात. तसेच या मोत्याची निर्मिती. त्याची झळाळी, टिकाऊपणा यामुळे मानवी जीवनातही ब-याच ठिकाणी तो रूपक अर्थाने येतोच. कधी तो गुणवर्णन करण्यासाठी, तर कधी अश्रू, दवबिंदू.. तर कधी प्रियेला उपमा देण्यासाठी.. आपणा सर्वांच्या एकापेक्षा एक सरस आणि वेगळा विचार करणा-या रचना अगदी मनभावन. एकेक रचना म्हणजे सुंदर मोती व त्या सर्वांची एक सुरेख मौक्तिक माळा तयार झालीय असेच वाटले. असेच ‘लिहीत रहा..व्यक्त व्हा’ या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे अभिनंदन.

आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री,सहप्रशासक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles