
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : मोत्यासम तू🌤️*
*🔹गुरूवार : २९ / १२ /२०२२*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मोत्यासम तू*
मोत्यासम तु माझा राजा
काय आणखी हवे मजला
नको गाडी बंगला अन थाट
झोपडीत सुखी संसार सजला
*✍️पौळ विनायक सर*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*मोत्यासम तू!!*
चंद्राची शुभ्र चांदणी
शोभते प्रशस्त नभात
मोत्यासम तू लावण्यवती
विराजली माझ्या मनात
*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*मोत्यासम तू..!!*
भासतेस मोत्यासम तू
वाटते ठेवावे जपून तुला
पण त्या शिंपल्याच काय होईल
या विचारानेच सावरतो स्वतःला
*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*मोत्यासम तू…*
आभाळी आश्रूंचे थेंब,
सागरकिनारी पडती,
दुर्लक्षित त्या शिंपल्यातुनी,
मोत्यासम तू मोती…
*साक्षी भोयर गुजरी राळेगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*मोत्यासम तू…. !*
शिंपल्यातल्या मोत्यासम तू…! लाभला मला
बनून माझ्या गळ्यातली मौक्तिक माला
तुझ्या अस्तित्वानेच माझ्या प्रीतीतला
प्रेमाचा सुगंध जीवनी दरवळला
*सौ.अनिता व्यवहारे*
*ता.श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*मोत्यासम तू*
घणाचे घाव सोसताच
जीवन तुझे झळकणार
कमी नको लेखू स्वतःला
मोत्यासम तू चमकणार
*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समुह सदस्य*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*चित्र चारोळी –मोत्यासम तू…*
मोत्यापरी तू तेजस्वी….
आरसपाणी सौन्दर्याची धनी
दुर्लक्षित मी शिंपल्यापरी
विखूरलेला सागर किनारी
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*मोत्यासम तू*
शिपंल्यातल्या मोत्यासम तू
आयुष्यात माझ्या आनमोल तू
लाखात आहेस एक आहे तू
माझ्या हदयातली श्वास तू
*विजय शिर्के , छ. संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*मोत्यासम तू*
मोत्यासम तू अनमोल
सहवास तितकाच खरा
सोज्वळ निर्मळ स्वभाव
हास्याचा वाहता झरा।।
*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💥🔹💥➿➿➿➿
*मोत्यासम तू…!*
दुर्लक्षितच शिंपले
मी सागर किनारी
मोत्यासम तू जाणता
मन घेते गगनभरारी
*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖