न्यू मून स्कूल येथे साने गुरुजी जयंती व वीर बालदिवस उत्साहात साजरा

साने गुरुजी जयंती व वीर बालदिवस उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

अर्जुनी/ मोर: येथील न्यू मून इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज अर्जुनी/ मोरगाव येथे बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो ही शिकवण देणारे भारताचे स्वातंत्र्यवीर पांडुरंग सदाशिव उर्फ साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. ‘श्यामची आई’ या अक्षरधन ठरलेल्या अजरामर कलाकृतीच्या संस्कार सौंदर्याचे बोधामृत विद्यार्थ्यांना पाजण्यात आले. या निमित्ताने विविध मराठी साहित्याचे वाचन शाळेत करण्यात आले.

तसेच दि.26/12/2022ला शिखांचे दहावे गुरू श्री गोविंदसिंह यांचे वीर पुत्र जोरावरसिंह व फतेहसिंह यांच्या बलिदान गौरवार्थ शाळेत वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने चार साहिबजादे हा ॲनिमेटेड चित्रपट प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणवैशिष्ट्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी त्यावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी शाळेचे प्राचार्य सचिन मेश्राम,राकेश उंदीरवाडे, तारका रुखमोडे, देवीदास बांडे,लिना चचाणे त्रिवेणी थेर, कुंजना बडवाईक, प्रतीक्षा राऊत ,हिना लांजेवार,शिला बोरीकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles