गाणारे पाषाण आणि रेखीव मंदिरे

गाणारे पाषाण आणि रेखीव मंदिरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_स्थापत्यकलेचे अनोखे छायाचित्र प्रदर्शन_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: गाणारे पाषाण , तरंगणाऱ्या विटा आणि कोरीव सुंदर मंदिरे अशा अनोख्या कलात्मक आनंदाचा प्रत्यय देणारे अनोखे छायाचित्र प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

पुण्याचे श्री.मोरेश्वर कुंटे व सौ विजया कुंटे या हौशी दांपत्याने बजाज एमफिफ्टी या दुचाकीवरून शेकडो मैल प्रवास करून महाराष्ट्रातल्या सतरा हजारांहून अधिक मंदिरांना भेटी दिल्या आणि या मंदिरांचे वैशिष्ट्ये आणि सौंदर्य टिपणारे हजारो छायाचित्र कॅमे-यात बंदिस्त केले.

अशाच चित्रापैकी निवडक छायाचित्रांचे सुंदर प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे नुकतेच भरवण्यात आले होते. सरत्या वर्षाला निरोप देताना मंदिराच्या स्थापत्य कलेचा वारसा आजच्या पिढी समोर ठेवण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वैविध्यपूर्ण छायाचित्र आणि त्याखाली मंदिराविषयी थोडक्यात माहिती अशी सुव्यवस्थित मांडणी हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरले.

मंदिरांविषयी सविस्तर माहिती देणारी अनेक पुस्तकेही तिथे ठेवण्यात आली होती. पाषाणातून निघणारे गायनाचे सप्त सूर व तरंगणाऱ्या विटा हे त्या प्रदर्शनाचे अगदी खास आकर्षण ठरले. पाषाणांवर आघात करून भारताचे राष्ट्रगीत वाजवल्याची एक दृकश्राव्य चित्रफीतही इथे प्रेक्षकांना दाखवण्यात येत होती. भारतीय परंपरेतील स्थापत्य कलेचा हा अद्भुत अविष्कार प्रेक्षक अचंबित होऊन पाहताना दिसले. ‘गीत गाया पत्थरोने ‘ या प्रसिध्द हिंदी सिने गीताचा प्रत्यक्ष
अनुभव जणु या निमित्त रसिकांनी घेता आला.

श्री मोरेश्वर कुंटे आता हयात नाहीत परंतु त्यांचे चिरंजीव श्री. प्रभाकर कुंटे या॔नी चित्र प्रदर्शनाची सर्व धुरा नेटकेपणे सांभाळली. प्रदर्शनाला भेट देऊन हा अनोखा चित्र खजिना न्याहाळणे आणि संबंधित विषयाची अधिक माहिती देणारी पुस्तकखरेदी करणे या अनोख्या आनंदात सरत्या वर्षाला निरोप देण्यास पुणेकरांनी पसंती दिलेली दिसली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles