स्काऊट गाईड संस्थेचा ‘बालकार्य सन्मान’ यंदा बालरंजन केंद्रास जाहीर

स्काऊट गाईड संस्थेचा ‘बालकार्य सन्मान’ यंदा बालरंजन केंद्रास जाहीर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: शिवाजी कुल स्काऊट गाईड पथकाचा १०५ वा वर्धापनदिन समारंभपूर्वक साजरा होत असून त्या निमित दोन दिवसीय ‘कुलरंग’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात दिला जाणारा ‘बालकार्य सन्मान’ यंदा भारती सोसायटीच्या ‘बालरंजन’ केंद्रास जाहीर झाला असून दि. ७ व ८ जानेवारी रोजी होणा-या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात हा पुरस्कार ‘शिवाजी मराठा सोसायटी’चे सचिव मा. आण्णासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या व्यक्तीमत्त्वं विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘बालरंजन’ केंद्राच्या संस्थापक संचालक माधुरीताई सहस्रबुध्दे व सहकारी हा पुरस्कार स्वीकारतील.

राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलच्या विजय तेंडुलकर सभागृहात आयोजित ‘कुलरंग’ महोत्सवास प्रसिध्द कवयित्री संगीता बर्वे आणि चित्रकार राहुल कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन कर्नल सदानंद साळुंके ( निवृत्त ) यांच्या हस्ते होईल, अशी माहिती कार्यकारी कुलमुख्य श्रावणी कदम यांनी दिली.

‘स्काऊट गाईड’ ही मुलांनी मुलांसाठी चालवलेली एक लोकप्रिय चळवळ आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने खेळ, व्यायाम, ज्ञान आणि मनोरंजन या माध्यमातून बाल व किशोर मुलांच्या शारीरिक, बौध्दीक व भावनिक अशा सार्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पुणे येथे सदाशिव पेठेतल्या स्काऊट गाईड मैदानावर रोज सायंकाळी ६ ते ७ या वेळात भरणा-या या शाखेत नियमित येणा-या मुलांची संख्या मोठी आहे.

अशा प्रकारे सातत्याने कार्यरत असलेल्या या संस्थेच्या शतकोत्तर महोत्सवी कार्यक्रमात, हा मानाचा सन्मान प्राप्त होताना ‘बालरंजन’ केंद्राचाही ३५ वा वर्धापनदिन याच महिन्यात साजरा होत असल्याने नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुध्दे यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles