सावित्रीबाई फुले जयंती निमित्त किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोलापूर: दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी मंगळवेढा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन श्री. कामसिद्ध विद्यालय खुपंसगी येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर साहेब तसेच मिस्टर सभापती श्री.सुधाकर मासाळ साहेब जिल्हा परिषद सदस्या श्रीमती.कोळेकर मॅडम पंचायत समिती सदस्या श्रीमती मस्के मॅडम गटशिक्षणाधिकारी श्री बी डी पांढरे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री लवटे साहेब,श्री.रणदिवे साहेब कामसिद्ध विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.वाले सर ,पाटकळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. भोसले सर तसेच सर्व केंद्रातील केंद्रप्रमख, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडले.

सर्वप्रथम दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या अगोदर श्री.ध.रे चव्हाण सर क्रीडा शिक्षक यांनी मुलींच्या करता योगासन व विविध कवायतींचे प्रकार याचं आनंददायी पद्धतीने खेळाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके घेतली. श्रीमती अमृता कुलकर्णी व श्री. अमित भोरकडे यांच्या टीमने सुमधुर आवाजात गितमंचातील गिताचे सादरीकरण केले . उदघाटनानंतर मंगळवेढा तालुक्यातील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ श्रीमती डॉ. शिर्के मॅडम यांचे मुलींचे आरोग्य शिक्षण यावर व्याख्यान झाले. त्यानंतर श्रीमती. गुंगे मॅडम यांचे शिक्षनाचे महत्व यावर व्याख्यान झाले, तसेच यशोदा पतसंस्थेच्या संस्थापक श्रीमती.अटकळे मॅडम यांची मुलाखत श्रीमती. चिमदे मॅडम यांनी घेतली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण शाळांनी केले.

रांगोळी ,पोस्टर ,लिंबू चमचा , धावणे अशा विविध खेळांचे आणि स्पर्धांचं आयोजन देखील याप्रसंगी करण्यात आलं होते. यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. शेवटी उपस्थिती आणि सहकाऱ्या बद्दल विविध सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे, शिक्षक, शिक्षिका तसेच कामसिद्ध विद्यालयाचे प्रांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशालेचे व सर्व ज्ञात अज्ञात आणि प्रत्यक्ष सहभागी सर्वांचे आभार विशेष शिक्षक श्री.अमोल कुलकर्णी सर यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles