
विश्वासाचे नाते
का.? खेळलीस खेळ
माझ्या भावने सोबत
स्वार्थ होते कि प्रेम ,
मलाच कळले नाही..!
ऐकले होते या प्रेमात
माणसं धोका देतात
माझे काय गं चुकले ?
मलाच कळले नाही..!
आहेस माझी म्हणून
विश्वास केला तुझ्यावर
तु परायीच होतीस ,
मलाच कळले नाही..!
तुला गरज ना प्रेमाची
अन् साथ माझी हवीय
तु वा-याची गं झुळूक
मलाच कळली नाही..!
आज वर्ष गेलंय लोटून
तुझी भेट झाली नाही
का गं तु रुसलीस ?
मलाच कळले नाही..!
कसे दुभंगून गेलंय
विश्वासाचे हे नाते ?
पुढे होईल तरी काय
मलाच कळत नाही..!
चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
====