
किती बघावी वाट?
किती बघावी वाट तुझी मी
यालाही काही मर्यादा आहे
तुझ्या एका होकारासाठी तर
आजतागायत मी झुरते आहे
जीव जडला तुजवरी सख्या
सांगू तरी गुपित तुज कसे मी
झुरते दिनरात मी तुजसाठी
वेदना मनीच्या सहवतेय मी
तुझ्यावर प्रेम झाले कधी कसे
काही उमगले ना मजला प्रिया
तुझ्या एका भेटासाठी सख्या
जीव माझा कासावीस होतया
प्रतीक्षा केली तुझी आजवर
वाटले उमजतील भाव मनीचे
नाते जुळलेमजसवे तुझे असे
हृदयातून खोलवर हृदयातरीचे
दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना
जागले प्रेम तुझ्याही मनात
गुलाब कळी उमलली अशी
माझ्याही हृदय मनमंदिरात
वेड लागले होते तुझे मजला
पाहताक्षणी तुज कसे सांगू मी
हृदयात दडवून ठेवल्या होत्या
हृदयातील माझ्या भावना मी
सार्थक झाले मज जीवनाचे
मिळाले प्रेम तुझे भरभरून
मनोकामना पूर्ण होता मनीची
मी ही आनंदाने गेले भारावून
वाटते मज आकाश ही ठेंगणे
गवसणी घालतेय आकाशी मी
दिगंतरी गरुड झेप माझी घेते
वादळवाऱ्याशीझुंज देईल मी
तमा न भावी संकटाची मज
संचारते अंगी वाघिणीचे बळ
तुझी मी किती बघावी वाट?
म्हणायची आता येणार ना वेळ
बी एस गायकवाड.
पालम, परभणी