
स्वप्नपूर्ती कला केंद्रातर्फे (दृष्टी) विजन कथेचे नाट्यमय सादरीकरण २७ रोजी
नागपूर: स्वप्नपूर्ती कला केंद्र आयोजित ओपन डायस मध्ये 27 जानेवारी 23 ला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ( दृष्टी ) विजन या कथेचे नाट्यमय सादरीकरण (एकल ) हिमानी पंत करणार आहे. यांचे दिग्दर्शन डॉ. संयुक्त थोरात यांनी केले असून सहदिग्दर्शन पियुष धुमकेकर व हर्षद सालपे यांचे आहे.
गुरुदेव ची ही कथा एका स्त्रीची वेदना सांगणारी आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत एका स्त्रीला आपल्या अस्तित्वासाठी कार्य संघर्ष करावा लागतो याची प्रचिती या कथेतून येते. कथेची नायिका आपल्या पतीच्या अर्धवट मेडिकल नॉलेज मुळे आणि तिच्यावर केलेले चुकीचे उपचार यामुळे तिला अंधत्व येते परंतु या अंधत्वातून जीवनाची नवी दृष्टी तिला प्राप्त होते. नायीकेचे जीवन, विचार, भावना, संवेदना संघर्ष आदि गोष्टींचा समावेश या कथेत आहे. असे पत्रकार परिषद मध्ये डॉ. संगीता देशपांडे आणि डॉ. संयुक्त थोरात यांनी पत्रकारांना सांगितले आहे.