
भाग्यवंत
अनाथ जीवनी ना कुणाची साथ
कुणी ना हक्कचा नाथ
उगवलो वाढलो पावसाची हाक
लहानाचा झालो वृक्ष
शेतीची करतो राखण
स्थान बांधावरी कुंपण
ना कधी जीवा सोस
माया पंखांची ना आस
रुप ना काटेरी काया
फळे गोड नाही चाखाया
औषध-डींक लाकूडफाटा उपयुक्त
काटेरी बाभूळ खरा मी भाग्यवंत
सुनीता पाटील
जिल्हा अहमदनगर