दावन…,मातीतुना अबारात कविता संग्रहाचे प्रकाशन
भंडारा: दिनांक २८/०१/२०२३ ला मौजा पिंडकेपार ता .साकोली जि.भंडारा येथे तिसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनात मुरलीधर ईश्वरदास खोटेले यांच्या दावन व मातीतुना अबारात या दोन झाडीबोली कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या अगोदर त्यांचे झाडीबोलीत माती मिरली मातीत (कविता व खंडकाव्य), झाडीतला गाव (कविता संग्रह), माती….जुल्ला नार (खंडकाव्य) प्रकाशित आहेत.
या प्रकाशन समयी संमेलन उद्घाटक परिणय फुके,झाडीबोली संशोधन महर्षी, संगीत नाट्यकला अकादमी पुरष्कृत , डॉ.हरिशचंद्र बोरकर, सहउद्घाटक पद्मश्री डॉ. परशूराम खुणे, पुर्वाध्यक्ष मनोहर नरांजे, डॉ. हेमकृष्ण कापगते, हिरामण लांजे, ॲड. लखनसिंह कटरे, सुनिता समरित, केंद्रीय सचिव राम महाजन, स्वागताध्यक्ष अमोल हलमारे संमेलनाध्यक्ष रंजना हलमारे, शाहीर लोकराम शेन्डे, प्रेमेश्वर बारसागडे, कवयित्री इंद्रकला बोपचे उपस्थित होत्या. सदर कविता संग्रहाला मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या.