“सूर्यनमस्काराच्या साधनेतून मिळते, आरोग्याचे बळ आणि मनाची शक्ती”; डॉ. आनंद गोडसे

“सूर्यनमस्काराच्या साधनेतून मिळते, आरोग्याचे बळ आणि मनाची शक्ती”; डॉ. आनंद गोडसेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मुलींनी केला भव्य सूर्यनमस्कार यज्ञ_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: “रथसप्तमीनिमित्त सूर्यदेवतेचे पूजन म्हणून सेवा वस्तीतील 500 मुलींनी पन्नास हजार सूर्यनमस्कार घालणे, हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून मुलींनी केलेला हा ‘सूर्यनमस्कार यज्ञ’ अगदी अनुकरणीय आहे. या साधनेतून शरीराला बळ आणि मनाला शक्ती मिळते. सूर्याच्या या शक्तीनेच हा ‘ नमस्कार यज्ञ’ घडवून आणला आहे.” असे प्रतिपादन उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रसिध्द डॉक्टर आनंद गोडसे यांनी केले. या इतक्या चांगल्या अनुभवातून यानंतर पुढे ‘एक दश लक्ष सूर्यनमस्कार’ आहुतीचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोथरूड येथील ‘सेवा आरोग्य फाऊंडेशन’ व ‘समग्र हेल्थ केअर सेंटर’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या भव्य उपक्रमात सेवा वस्तीतील ५०० मुलींनी ५० हजार सूर्यनमस्काराचे उद्दीष्ट्य नुकतेच पूर्ण केले आहे. रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर हा ‘सूर्यनमस्कार यज्ञ’ घेण्यात आला. याच्या सांगता समारंभात ‘सेवा आरोग्य फाऊंडेशनचे’ संचालक प्रदीप कुंटे, ‘सेन्साटा टेक्नॉलॉजीज’च्या अपर्णा दिवेकर,’श्रीया समर्थ हेल्थ टेक्नॉलॉजी’ च्या योजनगंधा मराठे, डॉ हर्शदा पाध्ये हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते..
सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून सूर्यनमस्काराचे खूप महत्त्वं आहे. सुदृढ मन आणि सुदृढ शरीर हा आरोग्याचा सोपा मंत्र आहे. पण त्यासाठी सध्याच्या गतीमान जीवनशैलीत सर्वांनाच व्यायामाला वेळ देणे शक्य नाही. म्हणून लोकांमध्ये सूर्यनमस्कार या परीपूर्ण व्यायाम प्रकाराचा प्रचार व प्रसार व्हावा, त्याबद्दल जागृती व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कोथरूड, वारजे, कर्वेनगर, शिवणे उत्तमनगर, एरंडवणे भागातल्या सेवा वस्तीतील 500 मुलींमार्फत ‘मकरसंक्रांत ते रथसप्तमी’ या सूर्य संक्रमण कालावधीत ‘ हा कार्यक्रम घेण्यात आला.
उपक्रमाची पूर्व तयारी म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘श्रीया’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वस्त्यांमधून जाऊन मुलींना आधी सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर १५ ते २८जानेवारी या काळात प्रशिक्षित मुलींना घरी सूर्यनमस्कार घालून उद्दीष्टपूर्तीचा विशिष्ट आकडा गाठला. याची नोंद नोंदणीकार्डवर घेण्यात आली.
या आरोग्यविषयक सुंदर उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानेच हे ५० हजार सूर्यनमस्काराचे उद्दीष्ट पूर्ण करता आले, अशी माहिती देऊन संयोजक संस्थांनी या यशस्वी उपक्रमातून पुढील वर्षी नक्की ‘एक दशलक्ष सूर्यनमस्कार’ चे उद्धिष्ट पूर्ण करू असा विश्वास व्यक्त केला.
सूर्यपूजा म्हणजे दररोज नियमित सूर्यनमस्कार. या पूजेसाठी प्रत्येकाने योग्य प्रमाणात व्यायाम, जरूरीपुरते जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे असून मोजके तेवढेच बोलणे ठेवले तर ही पूजा अखदी सफल होईल. प्रत्येकाला चांगले आरोग्य मिळावे यासाठी मकरसंक्रांत ते रथसप्तमी च्या कालावधीतील सूर्यनमस्कार यज्ञ सारखा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सर्व उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
डॉ हर्षदा पाध्ये यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “सेवा आरोग्य फाऊंडेशनचे कार्य वारजे परिसर, कर्वेनगर, कोथरूड व एरंडवणे या भागात सेवा वस्त्यांमध्ये सुरू असून सध्या संस्थेच्या आरोग्यवर्धन प्रकल्पमार्फत १८ साप्ताहिक दवाखाने,४ फिजिओ थेरपी केंद्र व दोन नेत्र तपासणी दवाखाने इतके लोकांच्या सेवेत रूजू आहेत. याशिवाय, ‘ घे -भरारी’ या किशोर विकास प्रकल्पाचे १५ वर्ग, समृद्धी प्रकल्पाचे १७ वर्ग यातून ३ ते १२ वयोगटातील मुलामुलींना संस्कारक्षम करण्याचे काम यामार्फत गेली अनेक वर्ष सुरू आहे.”

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात मुलींचा मान्यवर पाहुण्यांचा शुभहस्ते प्रशस्ती- प्रमाणपत्र देऊन सतकार करण्यात आला. वस्तीतील घरेलू महिला कामगारांनी आपल्या कामावर सुट्टी घेऊन सूर्यनमस्कार यज्ञात आपलामध्ये सहभाग नोंदविला या बद्दल संयोजक संस्थांनी या महिला॔चा गौरवपूर्ण उल्लेख केला. सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले.

हा भव्य सूर्यनमस्कार यज्ञ बघण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमले होते. ‘केशव माधव निधी’ चे सदस्य प्रकाश देशपांडे तसेच कर्वेनगर नगर परिसरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles