
वंशावळ
एक होते पणजोबा
अन् एक होती पणजी
त्यांना होती एक सून
तीच माझी आजी ।।१।।
आजी आणि आजोबांची
लाडकी मुले होती दोन
माझे बाबा आणि काका
आणखी ऐका होते कोण? ।।२।।
थोरल्या आत्याचा लाडका भाचा
धाकल्या आत्याची सोनू भाची
बाबा आत्यांची गट्टी मोठी
वंश-कुळाच्या वात्सल्याची ।।३।।
हुशार तितका मस्तीखोर
माझ्या बाबांचा पुतण्या गोड
सालस आणि सोज्वळ ऐसी
आई-पुतणीची जमते जोड ।।४।।
अशी सुखाची चाले आमुच्या
यशखानदानी वंशावळ
असा वारसा चालवत ठेऊ
जसा वाहतो निर्झर खळखळ ।।५।।
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव