
‘आमची टोपी छान, कागदी टोपीला मान’
_शैक्षणिक उपक्रमांतर्गत कागदी टोपीची संकल्पना_
वर्धा जिल्हा, प्रतिनिधी
समुद्रपूर: वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती समुद्रपूर येथील जि.प.उच्च प्रा.शा, सायगव्हाण येथे आज दि १३/०२/२०२३ रोजी शैक्षणिक उपक्रमांतर्गत वर्ग १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कागदी टोपी तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला.
दररोज कुणा ना कुणाचे वाढदिवस असल्याने आम्हालाही टोपी तयार करता यावी असे मुलांनी सांगितल्यावर टाकाऊ रद्दी पेपरपासून मुलांना कागदी टोपी तयार करण्याची प्रक्रिया सरांनी शिकवली. अवघ्या काही वेळातच मुला मुलींनी कागदी टोपी तयार करून परिधान केली. ‘आमची टोपी छान, कागदी टोपीला मान’ असे म्हणत आज विद्यार्थ्यांनी टोपी घालूनच अभ्यास करण्याचे ठरविले.
तसेच वाढदिवस असलेल्या मुलांच्या नावे घरूनच आपापली टोपी तयार करूनच आणणार असा संकल्पही केला. सृजनशीलतेचा नवा अनुभव नवी संकल्पना घेऊन आज मुलांनी स्व:निर्मितीतून आनंद मिळवला.