
शिवनीच्या शेतकरी परिवाराला ‘माणुसकीची भिंत’कडून मदत
_पाच फेब्रुवारीला आग लागून घराची राखरांगोळी झाली होती_
पुसद,प्रतिनिधी
पुसद: ‘माणुसकीची भिंत’ सदैव मानवीय विचार करणारी,अनेकांच्या जीवनात सदैव तत्परतेने उमंग निर्माण करणारी. उत्तम लक्ष्मण काळे रा. शिवनी ता. पुसद यांच्या घराला पाच फेब्रुवारीला आग लागून संपूर्ण घर व घरातील साहित्य अन्नधान्य, कपडे सर्व जळून खाक झाले. त्यांना शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्यामुळे स्वतः उत्तम काळे यांनी पुसद येथे येऊन माणुसकीची भिंत कडे मदतीची मागणी केली. माणुसकीची भिंत सदस्यांनी त्वरित त्यांना पाच ब्लॅंकेट व तीन साड्यांची मदत केली.
माणुसकीची भिंत शुभचिंतक व दात्यांच्या मदतीने चोवीस हजार आठशे चोपन्न रुपयाचे केले त्यामधून टीनपत्रे,लाकडी बल्या,भांडी, किराणा,कपडेची मदत शिवनी इथे जाऊन केली. या मानवीय कार्यास माणुसकीची भिंत पुसद,शिवप्रभा ट्रस्ट पुणे,सचिन घुमणर,m c l कंपनी पुसद,अतुल पुरुषोत्तमराव लकडे (अचलपूर),कुणाल कानडे,शशिकांत बेलोरकर,अर्चनाताई यादव,नानाभाऊ जळगावकर,दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल काकडदाती पुसद,निशांत लक्ष्मणराव देऊळकर,वर्षाताई ठोकाडे,बियानी ताई किराना अनिल क्षीरसागर,संदीप मैराळ पाटील,महेश मारुती,जयकुमार भालेकर,स्वाती मंगेश भगत,चंद्रकांत चावडे,शशांक शरद चेपुरवार,कन्हैया संजय भंडारी,आदिनाथ केटरर्स,साहेबराव देवसरकर,सुभाष कदम,संतोष तडकसे देवा मेडिकल,तनवी अमर गादेकर,आयुब पाटील,उद्धव गादेवार त्रिमूर्ती हार्डवेअर,सौ सुनीता सुरेश प्रतापवार काळी दौ,प्रशांत मेटकर,पंजाबराव राठोड,नवल देशमुख जांबादार,श्रीकृष्ण विठ्ठल जटाळे शशांक भाऊ वंझाळ या सर्व दात्यांच्या मदतीने चोवीस हजार आठशे चोपन्न रुपयांची मदत प्राप्त झाली आहे.
या सर्व मदतीतून उत्तम लक्ष्मण काळे रा शिवनी यांना अत्यावश्यक साहित्य घेऊन देण्यात आले, काळे दाम्पत्याने माणुसकीची भिंतचे आभार मानले. यावेळी उपस्थितीत केशवराव घुमनर, पंडितराव घुमनर, सचिन घुमनर, रूपसिंग राठोड, रामराव जाधव,अमोल घुमनर, योगेश घुमनर, शिवाजी हाके, भावराव पदमे,समाधान कुराडे, मारोती मानकर,दुर्गादास गुळवे,गंगाधर होळकर माणुसकीची भिंतचे मार्गदर्शक व शिवप्रभा ट्रस्ट पुणे उपाध्यक्ष परशराम नरवाडे, माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव,उपाध्यक्ष संतोष गावंडे,सचिव सोहम नरवाडे,सदस्य अनंता चतुर, पंजाब ढेकळे, शिवराम शेट्टे,धनंजय आघाव व इतर मान्यवर उपस्थित होते.