
प्रिये तू येशील का ?
रान हिरवळीवर मऊ मखमलीवर,
क्षितिजापलीकडील डोंगरावर,
चल सखी तू येशील का ?
मनात दडलेल्या हृदयात कोंबलेल्या,
ओठात थांबलेल्या शब्दकळ्यांना ,
प्रिये तू बाहेर काढशील का ?
कंठात दाटलेल्या नयनात साठलेल्या,
विरहाच्या आसवांना,
आज सखे तू गाळशील का?
जीवनात जरी तू नाही आलीस,
मनात मात्र तू घर केलीस ,
या घरात सदैव राहशील का ?
देह माझा व्याकूळ झाला ,
भेटण्यास प्रिये तुला ,
या देहास प्रेमामृत देशील का
बेबीताई विठ्ठलराव बोईनवाड.
जिल्हा नांदेड
=======