
रमणा मारोती युथ फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबीर संपन्न
नागपूर: शहरातील रमणा मारोती युथ फाउंडेशनच्या नवीन वर्षाची सुरवात एका श्रेष्ठ दानापासून झालेली आहे ते म्हणजे रक्तदान, महादान जीवनदान या संकल्पनेवर आधारित. रमणा मारोती युथ फाऊंडेशनतर्फे दि १२ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये ३० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी संस्थेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या रक्तपेढीला या शिबिरामध्ये मध्ये पाचारण केले होते.
या उपक्रमात शासकीय वैद्यकीय रक्तपेढीचे संयोजक श्री किशोर जी धर्माळे व त्यांचे सहकारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेश रतकंठीवार रमणा मारोती देवस्थान ट्रस्टचे श्याम गवळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण उरकुंडे यांची उपस्थिती होती.
या आधी या संस्थेकडून भरपूर सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वृक्ष लागवड , कोरोना काळात औषधींचे वाटप , रस्त्यावरील मुर्त्यांची विघटन करून खडू तयार करणे या सारखे अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या संस्थेने स्वबळावर केले आहे आणि हे काम असेच निरंतर सुरु राहील. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रुपेश ठवकर, लोकेश झुनके,श्रीकांत कळंबे,रितेश मुरोडीया,शैलेश गोन्नाडे,आशिष उरकुडे,स्वप्निल गभने,गणेश राऊत,अक्षय इखारकर, हेमंत कडमधाड, अमोल पडोळे , राहुल तिघरे , मनोज पाटील आसावरी शेंदरे आणि रमणा युथ फाउंडेशन सदस्य यांचे सहकार्य लाभले.