‘वेदना समजून घेण्यासाठी मनात संवेदना हवी’; सुहास हिरेमठ

‘वेदना समजून घेण्यासाठी मनात संवेदना हवी’; सुहास हिरेमठपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’सामान्यांच्या असाधारण कर्तृत्वाच्या कथा’: अनुवाद प्रकाशन समारंभ_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: चो-या, दरोडे, आत्याचार, भ्रष्टाचार करणा-यांच्या कथा तिखटमिठ लावून प्रसिध्दी माध्यमे मुद्दाम रंगवून लोकांपुढे ठेवतात. त्यातून सगळा समाज दुष्ट, भ्रष्ट आणि वाईट आहे, असे चित्र निर्माण होते. पण प्रत्यक्षात तसे अजिबातच नाही. उलट समाजात चांगल्या माणसांची संख्या खूप जास्त आहे. म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणात समाजाच्या हिताची कामे ऊभी राहीलेली दिसतात. त्यातही ज्याला आपण ‘सामान्य’ म्हणतो, अशीच माणसे चांगुलपण टिकवून ठेवतात आणि असाधारण असे कार्य करून जातात. कुणाची वेदना जाणून घ्यायची असेल तर मनात संवेदना हवी. तरच वेदना दूर करता येते.” असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते सुहास हिरेमठ यांनी केले.

‘सामान्यांच्या असाधारण कर्तृत्वाच्या कथा’ या अनुवाद प्रकाशन समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख पाहुणे, प्रसिध्द उद्योगपती वैद्यलिंगमजी, मुळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक – श्रीकृष्णप्रसाद,भारतीय विचार साधना प्रकाशनाचे अध्यक्ष डाॅ. गिरीश आफळे आणि अनुवादक- शरद कुंटे व प्रदीप नाईक उपस्थित होते. भारतीय विचार साधना प्रकाशन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रमुख पाहुणे श्री. वैद्यलिंगमजी यांनी या प्रसंगी बोलताना मुळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक श्रीकृष्णप्रसाद यांच्या लेखन विषयाचा गौरव करून सामान्यातल्या असाधारण कर्तृत्वाच्या आणखी ब-याच कथा अनुवादकांनी समाजासमोर आणाव्यात, ज्यायोगे अनेकांना अशा उदात्त कामाची प्रेरणा मिळेल, अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. लेखक श्रीकृष्णप्रसाद यांनी इंग्रजीतून मनोगत व्यक्त करून सामान्यांच्या असाधारण कामाने भारावून आपण हे कथा संकलन केले आहे, असे सांगून आपल्या लिखाणाचा हेतू विशद केला.

अनुवादकांच्या वतीने शरद कुंटे यांनी मनोगत मांडले. ते म्हणाले, ” स्वतःच्या रोजच्या जगण्यापेक्षा समाजासाठी किंवा एखाद्या ध्येयासाठी झपाटून काम करणा-या वेड्या माणसांच्या या इंग्रजी कथांचे मराठीत अनुवाद करताना मी व प्रदीपजी एका समृध्द अनुभवातून गेलो. रोज कित्येक पुस्तकं प्रसिध्द होतात पण सामान्य माणसाला कार्यप्रवण करणा-या अशा प्रेरणादायी पुस्तकांची खरी आवश्यकता आहे.” भारतीय विचार साधना प्रकाशनाचे डाॅ.आफळे यांनी प्रास्ताविक केले. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

पेरूगेट भावे हायस्कूलच्या प्र. ल. गावडे सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास अनिरुद्ध देशपांडे, श्याम भुर्के, हे मान्यवर तेसच भारतीय विचार साधना प्रकाशन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या दोन्ही संस्थाचे पदाधिकारी सदस्य व अनुवाद प्रेमी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles