
राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.संजय पाचभाई
नागपूर: जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे आंबेडकर सभागृह सांस्कृतिक भवन उर्मिला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे राज्यस्तरीय कवि सम्मेलन दिनांक 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. त्यात नागपूर येथील डॉ. संजय भानुदास पाचभाई यांची कविसम्मेलन अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राहुल पाटील सर आणि समूहातील परीक्षक यांचे संजयनी आभार व्यक्त केले, या संमेलनात 5 कविता संग्रह प्रकाशित तसेच मराठी भाषा गौरव दिन विशेषांकाचे प्रकाशन होणार असून राज्यातील 60 कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.
नागपुरातील ज्येष्ठ कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर सर प्रमुख अतिथी तर अतिथी संपादक व ज्येष्ठ कवी सुधाकर दादा भुरके मार्गदर्शक तर प्रमुख अध्यक्ष म्हणून प्रभाकर दहिकर वन्यजीव व निसर्ग प्रेमी, समाजसेवक उपस्थित राहणार आहेत.