
‘वाट मनोगताची…ओढ संत्रानगरीची’; संग्राम कुमठेकर
*हंबरून वासराला चाटते जवा गाय…*
*तवा मले तिच्यामध्ये दिसती मही माय*
२७ फेब्रुवारी २०१७ मध्ये कवीसंमेलनासाठी नागपूरला पहिल्यांदा आलो काय नि तेव्हापासून जणू या संत्रानगरीने मनाला भुरळच पाडलीय की काय…असंच मला नेहमी वाटतंय…अनेक गाण्यामध्ये आपण पाहतोय…जीवाची मुंबई…ची भुरळ पडलेली वर्णली जाते…पण संत्रानगरीची हवा मनाला नेहमीच हवीहवीसी का वाटते ? ..याचा खोलवर विचार केल्यावर लक्षात आलं (माझ्या दृष्टीने) की याच संत्रानगरीमध्ये अनेक कवी कवयित्री..लेखक लेखिका घडल्या आहेत..घडत आहेत…महान दीक्षाभूमीही याच नगरीत…तेथील माती प्रज्ञासूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली…ती कपाळी लावावी नि कृत्यकृत्य व्हावं ही आंतरिक इच्छा असेल माझी नि आहेच …
मला चांगलं आठवतं २०१७ ला पहिल्यांदा आल्यावर तिथेच सर्व शिलेदारांची पहिली भेट झाली नि जणू पुर्वाजन्मीचे ऋणानुबंध आहेत की काय असंच सारखं वाटू लागलं.”कधी कळणार तुला देवा माझ्या मनातील वेदना की बोथट झाल्या तुझ्या संवेदना…” ही रचना कवीसंमेलनात पहिल्यांदा सादर केली नि कौतुकानं जणू माझ्या साहित्यजीवनाला नवी उभारीच मिळाली…ते एक संत्रानगरीच्या ओढीमागचं कारण असू शकतं.एकदा अनंत अडचणीपुढे हतबल झालो नि औरंगाबाद येथील कार्यक्रमाला येऊ शकलो नाही परंतु ती खंत मनाला कायमची लागून राहिली.म्हणून मी ठरवलंय की अडचणीतून मार्ग काढायचा नि यापुढे एकही कार्यक्रम सोडायचा नाही.नुकताच झालेला लातूरचा कार्यक्रम जर आठवला तर वाटतं कोण कुठले आपण…ना रक्ताचे …ना जातीचे…मग एवढा जिव्हाळा…एवढी आपुलकी कशी निर्माण झाली ? …माणूस मुळातच समाजप्रिय आहे परंतु आपल्या देशातील जाती धर्माच्या बंद कवाडांनी माणसाचा स्वच्छंदपणे,मुक्तपणे जगण्याचा आनंदच हिरावून घेतलाय की काय असेच वाटते.परंतु या सर्व गोष्टींचा यत्किंचितही परिणाम फक्त नि फक्त मराठीचे शिलेदार समूहात दिसून येत नाही…याचं मुख्य श्रेय जर द्यायचं म्हटलं तर मुख्यप्रशासक राहुलदादा व सचिव पल्लवीताईं यांनाच जाते.
२०१७ पासून आजपर्यंत माझ्याकडून कमीतकमी २५०० ते ३००० कविता लिहिल्या गेल्या आहेत.या सर्व साहित्यप्रवासात माझ्या पाठीवर कौतुकाने थाप देणाऱ्या व वेळोवेळी प्रेरणा देणाऱ्या असंख्य ताई दादांंचा शतशः ऋणी आहे.
ओढ जीवाला भेटण्याची
निर्मळ मनाने हसण्याची
क्षणात रूसणे क्षणात हसणे
धन्य वाटते शिलेदारात बसणे
मागील महिनाभरापासून व्यक्त होण्याची इच्छा असूनही होता आले नाही.लातूरला स्थिरता आलीय परंतु नौकरीमुळे धावपळ वाढलीय.लवकरच आॕनलाईन बदल्यामुळे ती समस्या काही अंशी संपेल व नव्या जोमाने पुन्हा अनेक काव्यसंग्रह,कथासंग्रह,कादंबरी शिलेदार समूहाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा मानस पुर्ण होईलच.
“किती बघावी वाट” “प्रजासत्ताक” “वंशावळ” “आर्जव” “रंग हे नवे” या माझ्या रचना काव्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट मध्ये निवडल्या तसेच “सुख म्हणजे…” “या वळणावर” या चित्र चारोळ्या सर्वोत्कृष्ट ठरल्या तरी दोन शब्दात आभार मानू शकलो नाही त्यामुळे सर्वप्रथम मुख्य प्रशासक,मुख्य परीक्षक,सर्व सहप्रशासक या सर्वांची मनापासून दिलगीरी व्यक्त करतो…क्षमस्व.
कालच्या काव्यरत्न स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट रचनेमध्ये माझी “ओढ तीच अजूनही” ही रचना निवडली गेली त्याबद्दल पुनश्चः धन्यवाद…सर्व सहविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
सहप्रशासक म्हणून सर्व शिलेदारांना विनंती करतो की संत्रानगरीचा कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी प्रयत्न करू या…संमेलन निःशुल्क आहे फक्त फेटा व विशेषांकाच्या पाच प्रतीसाठी म्हणून अत्यल्प असे १०० रू पाठवायचे आहेत .आजीवन असो की वार्षिक सभाषद असो सर्वांनी पाठवायचे आहेत.
आदर्श वाचक बना व लिहित रहा …लिहित रहा…या तंत्राचा अवलंब करू या नि आपल्या शब्दफुलांचा सुगंध नक्कीच मराठी साहित्याला सुगंधीत करेल आणि यासाठी मराठीचे शिलेदार परिवार सदैव आपल्या सोबत आहे…याची शाश्वती मी देतो नि थांबतो
चला भेटू या संत्रानगरीत
ओढ तीच अजूनही
माय मराठीच्या समृद्धीची
ओढ तीच अजूनही
संत तुकोबाच्या अभंगाची
ओढ तीच अजूनही
सह्याद्रीच्या त्या सिंहाची
ओढ तीच अजूनही
बा भीमाच्या दीक्षाभूमीची
ओढ तीच अजूनही
शिलेदारांच्या संमेलनाची
ओढ तीच अजूनही
संत्रानगरीला त्या जाण्याची
संत्रानगरीला त्या जाण्याची
✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*