जिजाऊ ब्रिगेड पदाधिका-यांचा दादरा नगर हवेली येथे संवाद दौरा संपन्न

जिजाऊ ब्रिगेड पदाधिका-यांचा दादरा नगर हवेली येथे संवाद दौरा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दादरा नगर हवेली, प्रतिनिधी

सिलवासा: केंद्रशासित प्रदेश, दादरा नगर हवेली येथे शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.वैशालीताई पाटील, यामिनी खैरनार व मनीषा पवार यांचा सिलवासा संवाद दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातील धुळे येथून आदरणीय वैशाली ताई जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी नवसारी, सिलवासा, दमन या ठिकाणी संवाद दौ-याच्या निमित्ताने आल्या होत्या.

जिजाऊ ब्रिगेड सिलवासाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री भाऊसाहेब डेरे व इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वैशालीताई यांनी महिला शक्तीचा गौरव करून जिजाऊ ब्रिगेडच्या आगामी कार्याची ओळख सर्वांना करून दिली. येत्या काळात दादरा नगर हवेली किंवा दमण येथे जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा मानस ही त्यांनी बोलून दाखवला.

याप्रसंगी महिलांची बदलती भूमिका व कुटुंब सक्षमीकरणाचा मंत्र कसा जोपासावा याविषयी अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन केले. शिवाय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नियोजन किती महत्त्वाचे असते याविषयी आपल्या सविस्तर मार्गदर्शनात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक दाखले देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन कौशल्य याविषयी सर्वांना अवगत केले.

या कार्यक्रमाचे आयोजन दादरा नगर हवेलीच्या प्रदेशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे आणि पदाधिकारी यांनी केले होते. या कार्यक्रमात उपाध्यक्षा मनीषा वाघ, महासचिव विद्या कणसे, सहसचिव प्रांजली पाटील कोषाध्यक्ष मेघा वाघ, समन्वयक रीना भदाणे, सुजाता सोनवणे, साधना देवरे, शितल सोनवणे इत्यादी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles