सोलापूरचे कविवर्य, माजीसैनिक अशोक मोहितेंच्या ‘काव्यप्रहार’ संग्रहाचे प्रकाशन

सोलापूरचे कविवर्य, माजीसैनिक अशोक मोहितेंच्या ‘काव्यप्रहार’ संग्रहाचे प्रकाशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने यंदा वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या औचित्य साधून दि.२७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ ‘भेट मराठी मनाची’ हा राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. या प्रकाशन समारंभात सोलापूरचे कविवर्य, माजीसैनिक अशोक मोहितेंच्या ‘काव्यप्रहार’ संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले.

‘भेट मराठी मनाची’ या कार्यक्रमात राज्यस्तरीय कवी संमेलन, मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे पुस्तक प्रकाशन व मराठी भाषा गौरव दिन विशेषांक लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या 51 कवींनी आपल्या दर्जेदार रचनांचे सादरीकरण करून मराठीचा जागर घडवून आणला.

बार्शी तालुका जिल्हा सोलापूरचे कविवर्य, माजीसैनिक अशोक मोहितेंच्या ‘काव्यप्रहार’ संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष व उद्घाटक मा. प्रभाकर दहिकर, वन्यजीव मार्गदर्शक, सरंक्षक व समाजसेवक, प्रमुख मार्गदर्शक व अतिथी संपादक मा.सुधाकर भुरके, ज्येष्ठ कवी, नागपूर प्रमुख अतिथी मा. प्राजक्ता खांडेकर, सिनेतारका चित्रपट निर्माती, नागपूर, प्रदीप ढोबळे, व्याख्याते, कवी संमेलनाध्यक्ष: मा. डॉ. संजय पाचभाई, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. विजय शिर्के, छ. संभाजीनगर, प्रमुख पाहुणे: नागोराव कोम्पलवार, यवतमाळ प्रमुख पाहुणे: मा. द्रवेश जनबंधू, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. संतोष राऊत, गोंदिया, प्रमुख पाहुणे: संग्राम कुमठेकर, लातूर, प्रमुख पाहुणे: रंजना ब्राम्हणकर, गोंदिया व संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या वतीने अशोक मोहिते यांचा शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन अध्यक्ष राहुल पाटील व पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles