
जिल्हास्तरीय खुली जलद बुद्धीबळ स्पर्धेत सारिका गेडाम अव्वल
चंद्रपूर: दिनांक 26/02/2023 रोजी श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव 2023 मध्ये चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय खुली जलद बुद्धीबळ स्पर्धा (चेस) , चंद्रपूर व चंद्रपूर डिस्ट्रिक्ट चेस ऍन्ड रॅपिड चेस असोसिएशन, चंद्रपूर आयोजक मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 26/02/2023 ला सकाळी 10:30 वाजता राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पाडला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार, आनंद कवाडे सर , अध्यक्ष ,चंद्रपूर डिस्ट्रिक्ट चेस ऍन्ड रॅपिड चेस असोसिएशन चंद्रपूर , कुमार कनकम, सहसचिव, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट चेस ऍन्ड रॅपिड चेस असोसिएशन, यांच्या उपस्थितीत स्पर्धा घेण्यात आली.अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 200 स्पर्धक उपस्थित होते.
वेळेचं बंधन म्हणून 15 मिनिटे प्रत्येक स्पर्धांना बंधनकारक करण्यात आले.एकूण सात राऊंड घेण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पारितोषिके,मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यात पहिली उत्कृष्ट महिला म्हणून सारिका डी गेडाम, चंद्रपूर यांचा समावेश आहे. तसेच सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.