
‘माधवबाग क्लिनिक येथे आयोजित कार्यक्रमाबाबत माझे मनोगत’; राधा खानझोडे
नागपूर: धरमपेठ माधवबाग क्लिनिक येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे वर्णन करताना मन भारावून गेले. भारदस्त असा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला. माधवबाग क्लिनिकच्या डॉ. कीर्ती मीरचे मॅडमची यशस्वी कार्यकारिणी, त्यांची उपचार पद्धती आणि क्लिनिकचा स्टॉप, पेशंट बद्दलची वाटणारी कळकळ, माझा पेशंट हा बरा होणारच, हसत जाणारच हा आत्मविश्वास डॉ. कीर्ती मॅडमच्या चेहऱ्यावर झळकत होता.
धरमपेठ माधवबाग क्लिनिकचे पेशंट आपले अनुभव कथन करताना डॉक्टर कीर्ती मॅडमच्या उपचारा दरम्यान कितीतरी पेशंट रोगमुक्त झाले हे सांगताना प्रत्येकालाच अश्रू आवरले नाहीत .त्यांच्या भावना उचंबळून आल्या .थोडा वेळ त्या भावनेच्या ओघात वातावरण आनंदाश्रूंनी भरून गेले. प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत होते डॉ.कीर्ती मॅडम व त्यांचा स्टाफ..
मुख्यत्वे सौ. प्रगती मॅडम त्यांचं कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. भारीच सूत्रसंचालन सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रगती मॅडम आपण कौतुकास्पदच आहात. स्वागत गीत खूप छान गायले. बाकी माधुरी, गोपाल,रवी दादा सगळे कसे कार्यदक्ष कौतुक आहे या क्लिनिकचं आणि इथल्या उपचार पद्धतीचं. या उपचाराने 100% आम्ही बरे होणारच हीच हमी प्रत्येक पेशंटच्या चेहऱ्यावर झळकत होती.
तसेच या कार्यक्रमादरम्यान सादर केलेली मी स्वलिखित विनोदी ( वऱ्हाडी भाषेत) बहिणाबाई ही नाटिका…. आणि साथ देणाऱ्या सौ.प्रगती मॅडम यामुळे ती नाटिका अधिकच रंगतदार झाली. तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आणि सौ. मुलमुले ताई यांनी एक नाटिका उत्तम रित्या सादर केली. त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलें यांच्यावर मी पोवाडा सादर केला. श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. अध्यक्ष भाषणांनी चार चांद लागले. तसेच सरांचे मनोगत खूपच छान. महिला दिनानिमित्त महिलांचे योगदान म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तसेच बहुवंशी स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुषाचा हात असतो हे त्यांनी आपल्या भाषणात पटवून दिले अगदी बरोबर आहे सर.
मी धरमपेठ माधवबाग क्लिनिक आणि डॉक्टर कीर्ती मिरचे मॅडम यांची खूप खूप आभारी आहे .प्रत्येक वेळेला मला निमंत्रण देऊन माझे साहित्य सादर करण्याची संधी देतात .खूप खूप धन्यवाद कीर्ती मॅडम..!!
सौ. राधा खानझोडे,नागपूर.
कवयित्री, लेखिका