
धुलीवंदनाच्या दिवशी कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा
_मनपाची वाहतूक व्यवस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांना होणार अडचण_
सुबोद चहांदे, नागपूर
नागपूर :- केंद्र सरकारचे विविध विभाग आणि कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील
*कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी)* पदवीधर निवड परीक्षा धुलिवंदनाच्या दिवशी आज (दि.7 मार्च 2023) शहरातील काही परीक्षा केंद्रांवर आयोजित केली आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात धुडीवंदन साजरा होत आहे या दिवशी देशभरात गुलाल आणि रंगाची उधळण केली जाते. होळीच्या सण तरुणांच्या विशेष आवडीच्या आहे. या दिवशी रंग पिचकारी आणि पाण्याचे फुगे एकमेकांच्या अंगावर फेकून मजा करायला तरुणांना आवडतं.या आनंदाच्या क्षणात काही नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागतो. ठीक ठिकाणी रंग खेळण्यासाठी जमलेल्या अनेक नागरिकांशी आणि मुलींची गैरवर्तने होते. या दिवशी रस्त्यावरून जाताना अंडी चिखल, विर्यानी भरलेले फुगे किंवा अग्यात द्रव फेकले जात असल्याच्या अनेक घटना राज्यात घडलेल्या आहेत. या अयोग्य वर्तनाकडे अनेकदा निरूपद्रवी मजेच्या नावाखाली काना डोळा केला जातो. ‘बुरा ना मानो होली है’ यासारखे वाक्यप्रचार वापरून महिलांशी मुलींची वाईट वर्तणूक केली जाते.
धुलीवंदनाच्या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षा खरंच योग्य आहे का? असा मोठा प्रश्न शहरातील पालक वर्ग आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडत आहे.
*मनपाची वाहतूक व्यवस्था बंद*
आज धुलीवंदन असल्याने नागपूर महानगरपालिका च्या वतीने संचालित असणाऱ्या आपली बस बंद करण्यात आलेली आहे. ही बस दिनांक 6 मार्च सायंकाळी ते 7 मार्च पूर्ण दिवस बंद असणार आहे. या परीक्षेला नागपूर शहरातील व नजीकच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात दाखल होणार आहेत. यामध्ये विद्यार्थिनींच्या देखील समावेश असणार.
या परीक्षेकरिता परीक्षा केंद्र वाडी येथील देण्यात आलेला आहे. परीक्षा करिता शहरातील आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थीशहरात दाखल होणार आहेत. मनपाची वाहतूक व्यवस्था व शहरातील ऑटोव्यवस्था बंद असल्याने परीक्षा केंद्रावर जाण्याकरिता परीक्षार्त्यांना अडचणींना समोर जावे लागणार.