महसूल अधिकाऱ्यांना हेतूपुरस्पर फसविण्याचा डाव

महसूल अधिकाऱ्यांना हेतूपुरस्पर फसविण्याचा डाव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_तस्करांमध्ये रचले जात आहे षडयंत्र ; नागरीकांत चर्चा_

लाखांदूर : मागील काही महिन्यांपासून महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गौण खनिज तस्करां विरोधात धडाकेबाज कारवाई केली जात आहे. या कारवाई अंतर्गत तस्करी करताना रंगेहात पकडल्या गेलेल्या विविध ट्रक व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने त्रस्त काही तस्करांकडून महसूल अधिकाऱ्यांना हेतूपुरस्पर फसविण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याची आरोपपूर्ण चर्चा नागरिकांत केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक लाखांदूर तालुक्यात वैनगंगा व चुलबंद नदी अंतर्गत मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध होते. तर तालुक्यातील काही भागात मुरूमासह अन्य गौण खनिज देखील उपलब्ध होते. मागील काही वर्षात विविध विकासकामांसह खाजगी बांधकामात गौण खनिज उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित करण्यात आले होते मात्र रेतीघाट लिलाव न झाल्याने तालुक्यातील काही भागात रेती तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
दरम्यान, रेतीसह अन्य गौण खनिज तस्करीवर प्रतिबंधक घालण्यासाठी शासन व प्रशासना अंतर्गत निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यात गौण खनिज तस्करी विरोधात धडक कार्यवाहीची मोहीम आरंभिली आहे. या कारवाई अंतर्गत स्थानिक लाखांदूर येथील तहसील कार्यालयाच्या मैदानात मागील काही महिन्यात तस्करी करताना रंगेहात पकडलेले विविध ट्रक व ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याने गौण खनिज तस्करांत प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे.

स्थानिक लाखांदूर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी गौण खनिज तस्करी करताना ट्रॅक्टर व टिप्पर रंगेहात पकडून दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा केले. मात्र तस्करी करताना सापडलेल्या काही वाहनधारकांनी मागील काही महिन्यापासून कारवाई अंतर्गत दंडाचा भरणा केले नसल्याने तस्करी करताना पकडलेले वाहन तहसील कार्यालयातच जमा आहेत.
दरम्यान, लाखो रुपयाच्या दंडाच्या भरणाला घेऊन तालुक्यातील काही गौण खनिज तस्करांनी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना फसविण्यासाठी षडयंत्र रचल्याची चर्चा केली जात आहे. त्या अंतर्गत तस्करांनी शासन व प्रशासनाची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत अधिकाऱ्यां विरोधात बिनबुडाचे आरोप करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याची देखील बोंब आहे.

याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शासन निर्देशानुसार तस्करी विरोधात कारवाई करीत असलेल्या अधिकाऱ्यांना हेतूपुरस्पर खोटे गुन्ह्यात अडकविण्यासाठी षडयंत्र रचणाऱ्या तस्करांचे पितळ उघडे पाडण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles