
अर्जुनीत डॉ.आंबेडकर जयंतीदिनी प्रा. प्रशांत ठाकरे यांचे समाज प्रबोधन
हंसराज खोब्रागडे, प्रतिनिधी
गोंदिया/ अर्जुनी मोरगाव: ‘हिंदू कोड बिल’ च्याद्वारे संपूर्ण भारतीय महिलांना समान न्याय, हक्क, समानतेची मुहुर्तमेढ रोवून, महिलांना त्यांच्या अंधकारमय जीवनातून प्रगतीचे दिशानिर्देश दाखविणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महोत्सव १४ एप्रिल २०२३ रोजी साजरी करण्याच्या अनुषंगाने; जागतिक महिला दिनी संविधान चौकातील बुद्ध विहारात अर्जूनी येथील संपूर्ण बौद्ध उपासक/उपासिकांची सभा सन्माननीय कृष्णाजी शहारे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
सभेची सुरुवात बुद्धवंदनेने करण्यात आली. जयंती कार्यक्रम मिरवणूक ही डाॅ. आंबेडकर वार्ड येथून सुरुवात होऊन शहरातील मुख्य रस्त्याने सर्व विहारांच्या मार्गाने मार्गक्रमण होऊन संविधान चौक बुद्ध विहारात सांगता करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी समाज प्रबोधन कार्यक्रमसंबंधी चर्चा करण्यात आली. त्यामुळे अकोला येथील बहुजन समाजप्रबोधनकार, ज्यांची प्रत्येक विषयावर मजबूत पकड आहे असे डॉ. प्रा. प्रशांत ठाकरे महाराज यांचा कार्यक्रम अंतिम करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन पी एन. जगझापे सर यांनी केले व आभार हंसराज खोब्रागडे यांनी मानले.