
लोहार लाईन येथे एकाच कुटुंबातील सदस्यांना पाच जणांनी केली बेदम मारहाण
_भांडण सोडविण्याच्या वादातून हाणामारी_
पुसद प्रतिनिधी
पुसद : शहरातील लोहार लाईन येथे भांडण सोडविण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संतोष रामपाल मुकेश ५८ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात विविध कलमानव्य गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
संतोष मुकेश यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अजय संजय पोंगाडे वय २५ वर्ष व अधिक चार जण सर्व राहणार हनुमान वॉर्ड पुसद यांनी भांडण सोडविण्याच्या कारणावरून वाद उपस्थित करून जातिवाचक भाषेत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी संतोष मुकेश यांचे नातेवाईकांना लोखंडी रॉड, फाईटने मारहाण करून जखमी केले. दरम्यान आरोपींनी जिवाने मारण्याची सुद्धा धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले. दिलेल्या तक्रारीवरून सदर आरोपींविरुद्ध १४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४, भादवी सहकलम ३(१)एस, ३(१) आर, ३(२) व्हीए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.