‘संत तुकाराम महाराज’

‘संत तुकाराम महाराज’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकताचं आपल्या मनाला समाधान लागते .मनाचा वेध घेणारे असे शब्द त्यांच्या अभंगात असतात .तेवढेच त्यांच्या कवितात देखील अगदी प्रेम आणि माया उत्स्फूर्त भरलेली असते.संत तुकाराम महाराजांचे इंद्रायणी नदीच्या तीरावर साहित्य बुडाले म्हणतात, पण जेव्हा त्याच तीरावर संत तुकाराम महाराज आपले अभंग लोकांच्या तोंडातून ऐकातात तेव्हा संत तुकारामांना वाटते की, माझे अभंग तर सर्वांच्या मुखात आहे मग कसे म्हणावे ते बुडाले म्हणून ……

संत तुकाराम महाराजांना अंधश्रद्धा ,पाखंडेपणा यांचा राग होता. ते नेहमीच आपल्या अभंगातून पाखंडी लोकावर लिहीत असायचे .निसर्गावर त्यांचे खूप प्रेम होते. चरचरा प्रेम आहे हा निसर्ग आपल्याला खूप भरभरून देतो म्हणून, एकमेकाबद्दल प्रेमभावना मनात ठेवा असा संदेश दे कधी कधी आपल्या कवितेतून ,अभंगातून देतात.

वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे संत तुकाराम महाराज एक समाज सुधारक देखील होते समाजसुधारणा होऊन लोकांमध्ये परिवर्तन व्हावे हा त्यांचा नेहमी मुख्य उद्देश असायचा. संत तुकाराम महाराजांचे अभंग ग्रामीण भागात आवडीने गात असतात. त्यांच्या कविता, अभंगावर आताही कितीतरी साहित्यिक व विचारवंतांचा अभ्यास सुरू आहे. त्यांचे साहित्य लेखन अगदी मनाला विचार करणारे आहेत.

त्यांच्या साहित्यातून आपल्याला
मार्गदर्शन मिळते. रंजल्या गांजल्याची सेवा करणे हा त्यांचा उद्देश असे. आपल्या भजन कीर्तनातून ते सामान्य माणसाला एक चांगले व्यक्तिमत्व घडविण्याकरिता उद्देश करीत असत. संत तुकाराम महाराजांची वाणी अगदी मधुर आणि गोड होती. ते आपल्या अभंगातून ऐकणाऱ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असत. बरेच जण त्यांच्या साहित्यावर आता पीएचडी करतात .आपल्या अभ्यासाकरिता संत तुकाराम महाराज त्यांचे,अभंग ,कविता कीर्तन हा विषय निवडतात.

असे ज्येष्ठ ,श्रेष्ठ साहित्यक, विचारवंत ,कीर्तनकार ,अभंगकार, आपल्या अभंगातून समाज सुधारण्याचा संदेश देणारे महान संत तुकाराम महाराज यांना माझे त्रिवार नमन, कोटी कोटी प्रणाम !!

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या काही ओळी

जे का रंजले गांजले !त्यासि म्हणे जो आपुलें!!
तो चि साधू ओळखावा! देव तेथें चि जाणावा!!

लेखिका -सोनाली रायपुरे-सहारे ब्रम्हपूरी जि चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles