जागतिक महिला दिनी लोक अधिकार परिषदेतर्फे मोर्चा

जागतिक महिला दिनी लोक अधिकार परिषदेतर्फे मोर्चा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: जागतिक महिला दिनाच्या दिवशी लोकाधिकार परिषदेच्या नेतृत्वाखाली मैत्री गुंतवणूकदार व प्रतिनिधी महिलांनी राज्य सरकारला त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मागितला. लोकाधिकार परिषदेच्या सचिव मायाताई उके यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरच्या विधान भवनाच्या समोर असलेल्या संविधान चौकामध्ये जागतिक महिला दिनाच्या दिवशी लोकाधिकार परिषदेने माहिती गुंतवणूकदार व प्रतिनिधी महिलांनी आपल्या पैशाची मागणी राज्य सरकारला केली.

लोकाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले आजच्या दिवशी महिलांचा सत्कार व्हायला पाहिजे परंतु मागच्या 15 वर्षापासून कमकुवत सरकार राज्यांमध्ये असल्यामुळे आज “जागतिक महिला दिना”च्या दिवशी महिलांना रस्त्यावर येऊन बसावं लागलं. ही देशातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील एकनाथ शिंदे सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे असे मी मानतो. ते पुढे म्हणाले हे सरकार खोटारड्या नेत्यांचे सरकार आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी लोकाधिकार परिषदेच्या नेतृत्वामध्ये विधान भवनावर 15 हजार पेक्षा जास्त मैत्रेयचे गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांनी “बांगड्या घाला मोर्चा” काढला होता.राज्य सरकारच्या दारावर महिला बांगड्या घेऊन आल्या तरी या सरकारला लाज वाटली नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे मोर्चाचे निवेदन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकार केले होते व चर्चेत शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध विभागाच्या सचिव, लोकाधिकार परिषदेचे सभासद व गुंतवणूकदार यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

हिवाळी अधिवेशनानंतर लवकरच मैत्रेय प्रकरणावर राज्य सरकार मीटिंग आयोजित करेल असे म्हटले होते. अद्याप राज्य सरकारने मैत्रेयच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी बैठक आयोजित केली नाही.”जागतिक महिला दिना”च्या मैत्री गुंतवणूकदार व प्रतिनिधी महिलांनी नागपूर येथील संविधान चौकामध्ये “बांगड्या घाला धरणा” आयोजित होता. लोकाधिकार परिषदेने आजच्या आंदोलनाचे निवेदन शासनाला दिले नाही. सर्वसामान्यांची सरकार आहे असं म्हटल्या जाते परंतु मैत्रेय गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे मिळू नये यासाठी पण सरकारच कटकारस्थान करीत आहे.

या धरण्याच्या माध्यमातून लोकाधिकार परिषदेने1) BUDS ACT 2019 अनियमित जमा राशी अधिनियम प्रतिबंधक कायदा 2019 या कायद्याअंतर्गत शासनाने MPID न्यायालया मधून केस उच्च न्यायालयामध्ये दाखल करणे, 2)मैत्रेय प्रकरणाची सीबीआय चौकशी करणे, 3)वर्षा सत्पाळकर यांना त्वरित अटक करणे, 4) मैत्रेयची समूहाची संपत्ती शासनाकडे असल्यामुळे शासनानेच मैत्रेय संमुहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्या परतावा द्यावा. अशा प्रमुख मागण्याला घेऊन जागतिक महिला दिनाच्या दिवशी लोक अधिकार परिषदेने नागपूर येथील विधानभवनाच्या समोर संविधान चौकामध्ये एक दिवसीय”बांगड्या घाला धरणा” दिला. धरण्याला यशस्वी करण्यासाठी कल्पनाताई कापसे, प्रवीण रोगे, समनवार सर, ज्ञानेश्वर उके, पराते सर, मंगलाताई हांडे, मंदाकिनीताई उलमाले, मंदाताई आत्राम, परचाके सर, सूर्यकांता ताई घरडे, कुचनकर मॅडम, मौननाथ मेश्राम, चंद्रशेखर नाकाडे, कौशल्या ताई बघेले, शालिनीताई टेंभुर्णे शालिनीताई पाटील, सुनील पागे सर, मच्छिंद्र वाघमोडे सर, कैलास गारे सर, कडू सर, लायनकर मॅडम, गौरीताई सदावर्ते, निशाताई बोरकर, ताराबाई मते, तामसेटवार मॅडम, अशा अनेक गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी धरणा आंदोलन यशस्वी करण्यासाठी अतिशय परिश्रम केले. धरणा आंदोलनाचे संचालन कामतवार यांनी केले तर मंगेश मेश्राम यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles