खरोखरच, अर्थसंकल्प यांना समजतोय काय ?

खरोखरच, अर्थसंकल्प यांना समजतोय काय ?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा २०२३ – २४ चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. तसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच गुणगाण गायला देखील सुरुवात झाली. तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल मत व्यक्त करून राज्याच काय भल केल ? अशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. हे सर्व पाहता ज्या लोकांना ठेकेदारीच्या पलीकडे काही समजत नाही अशा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अर्थ संकल्पावर चांगल वाईट अस भाष्य करत आपल मत व्यक्त कराव याच नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

कुणाला किती कळतय ? हे माहित नाही परंतू पक्षाचे पाईक म्हणून वरचे लोक जे निर्णय घेतात त्यावर खुशी दाखवत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे पाहिल तर जन माणसाचा विचार न करता हे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी अशी काय निष्ठा दाखवतात? याबद्दल कुणी संताप व्यक्त करीत असेल तर नवल वाटण्यासारख नाही.

या अर्थसंकल्पामध्ये महिला आणि मुलींना खुप मोठी आर्थिक सुरक्षा दिली आहे. याशिवाय अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात देखील वाढ केल्याचे नमुद केले आहे. या स्वागतार्ह बाबी असल्या तरी विकासाच्या नावान जे दिल आहे ते नक्कीच कमी दिल आहे अस म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्यातील जनतेचे प्रश्न सुटायला तयार नाहीत. कोणत्या ना कोणत्या खात्यातील नोकरदार अधिकाऱ्यांच्या संघटना जेव्हा आंदोलनाच हत्यार उपसतात तेव्हा आश्वासनाच्या खैराती वाटल्यानंतर त्याची कधी ना कधी पूर्तता केली जाते. असे असले तरी सर्वांचे प्रश्न मात्र कोणतही सरकार असो ते सोडवु शकलेल नाही.

आज राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार आहे. या सरकारमधील विशिष्ट नेते मंडळी आणि विरोधकातील मंडळी यांच्या आता पर्यंत कुरघोड्या चालत आलेल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांच्या सरकारच्या काळात अर्थसंकल्प सादर केला जात आहे. कोणतही सरकार असो त्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी नेते संतुष्ट असतात नव्हे तर अर्थसंकल्पाचे गोडवे गात असतात. पण विरोधक मात्र नाखुशी व्यक्त करत टिका टिपण्या करीत असतात. हे आता पर्यंत पाहिलेल आहे. परंतू ज्यांना कंत्राट घेण्यापलीकडे काही कळत नाही अशा सत्ताधारी पक्षातील व्यक्तींनी अर्थसंकल्पाचा आनंद व्यक्त करावा आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी टिका, टिपण्या कराव्यात याचा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

यापैकी एकही व्यक्ती सरकारचे धोरण कसे चांगले आहे हे जर सांगु लागला तर शहरा पासुन ग्राम पातळीवरील नागरीक आमच्यासाठी काय दिले? असा प्रश्न करु लागला तर यांच्याकडे नक्कीच उत्तर नसेल. विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते देखील अर्थतज्ञ नाहीत. ज्या योजना दिल्यात त्यातून काय भले होणार आहे, काय भले होणार नाही. हे सांगु शकणारे नाहीत. परंतू वरीष्ठ नेत्यांच्यासाठी आनंद व्यक्त करणे आणि विरोध करणे एवढच यांना माहित असावे. अर्थसंकल्प समोर आला तस काहींनी फटाके फोडले आणि या अर्थसंकल्पाच गुणगाण गायले. एवढा अभ्यास जर या पदाधिकाऱ्यांचा असेल तर अशा व्यक्ती निवडणुकीत आमदार, खासदार या पदाला शोभणाऱ्या का ठरु शकत नाहीत ? केवळ पक्षाच हित पाहुन फटाके फोडणे अथवा विरोध करणे म्हणजे आपण पूर्ण ज्ञानी आहोत असे कुणीही समजु नये असे कुणाचेही मत आल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles