जिल्हास्तरीय जागतिक महिला मेळावा संपन्न

जिल्हास्तरीय जागतिक महिला मेळावा संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर: जिल्हा पुरोगामी महिला मंचच्या विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक १२/३/२०२३ रोज रविवारला मा.सा.कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे भव्य दिव्य महिला मेळावा उत्साहापूर्ण वातावरणात पार पडला.

महिला दिनानिमित्त जीवनातील महादान म्हणजेच रक्तदान शिबिर, सांस्कृतिक नृत्य, सत्कार समारंभ अशा विविधांगी बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सक्षम स्री सक्षम कुटुंब दर्शवणारी दारातील रांगोळी सर्वाचे लक्ष वेधत होती.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रक्तदात्यांनी रक्त देवून या कार्यक्रमाची सुरुवात केली . सावित्रीबाई फुले, आबासाहेब पाटील,स्व.भानारकर काकाजी यांच्या प्रतिमेचे पूजन, दिपप्रज्वलनाने उद्घाटन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डाॅ.अल्काताई ठाकरे राज्याध्यक्ष महिला मंच, अध्यक्षा मा.श्रीमती चंदा ताई खांडरे राज्य महिला मंच सल्लागार ,विशेष अतिथी डॉ.राधिका बरडे सौंदर्य तज्ञ तथा त्वचा रोग तज्ञ नागपूर,प्रमुख अतिथी मा.हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, मा.निखिल तांबोळी राज्य कार्यकारी सचिव मा. सुनिता इटनकर जिल्हा नेता, मा.दिपक व-हेकर जिल्हा सल्लागार,मा.नारायण कांबळे जिल्हा नेता,मा.किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

आर्थिका उपाध्य हिच्या स्वागत नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.डाॅक्टरेट पदवि मिळविल्या बद्दल मा.अल्काताईंचा संघटनेच्या वतीने शेला, मोमेंटो,पुष्प देऊन सत्कार .’अहिल्याबाई होळकर’ राज्य पुरस्काराच्या मानकरी कु.रजनी मोरे यांचा संघटनेच्या वतीने शेला, मोमेंटो, पुष्प देऊन सत्कार,ज्योती खरकाटे,पुनम सोरते, गंगाधर बोंडे या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष म.मं मा.विद्या खटी यांनी तर डॉ राधिका बरडे यांनी सौंदर्य व केसांची निगा यावर अतिमोलाचे मार्गदर्शन केले सोबतच आई वडिलांचा सत्कार भाजी पुरी व काला जामुन चा आस्वाद घेत सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

‘वैयक्तिक नृत्यामधे
प्रथम क्रमांक:-भद्रावती,
द्वितीय क्रमांक:- मुल
तृतीय क्रमांक:- ब्रम्हपुरी

समुह नृत्यामधे
प्रथम क्रमांक:- भद्रावती
द्वितीय क्रमांक- मुल
तृतीय क्रमांक- पोंभूर्णा

सर्वच स्पर्धकांना प्रमाणपत्र व प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रोहित पाचांळे व अंकिता कामतवार हे होते.पहिल्या सत्राचे धडाकेबाज आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस म.मं.पोर्णिमा मेहरकुरे ज्योती खरकाटे व दिक्षा करमे यांनी बहारदार सुत्रसंचालन केले.भव्य दिव्य कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles