पुसद तालुका खरेदी-‎ विक्री संघासाठी आज होणार मतदान‎

पुसद तालुका खरेदी-‎ विक्री संघासाठी आज होणार मतदान‎पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_ॲड. वीरेंद्र राजे यांच्या उमेदवारीने ‘ही’ निवडणूक चुरशीची_

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य‎ असलेली पुसद तालुका सहकारी शेतकी‎ खरेदी-विक्री संघांच्या संचालक‎ मंडळाच्या निवडीसाठी आज रविवारी दि. १९ मार्च२०२३ रोजी मतदान होणार आहे. सोमवारी मतमोजणी व‎ निकाल जाहीर करण्यात येईल, असे‎ निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भालेराव यांनी सांगितले.‎

तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीच्या‎ निवडणूक अनुषंगाने पुसद शहरातील व तालुक्यातील राजकीय‎ वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार प्रतिनिधी व वैयक्तिक मतदार संघातील अधिकृत उमेदवार तर‎ तसेच‎ अपक्ष म्हणून छत्री या निशाणीवर ॲड. वीरेंद्र जगजीवन राजे हे प्रबळ उमेदवार म्हणून निवडणूक‎ रिंगणात उतरले आहे.खविसवर सत्ता‎ मिळवण्यासाठी हे पॅनल मतदारांच्या‎ गाठीभेटीवर जोर देत आहेत. ‘खविसं’च्या‎ निवडणुकीत प्रत्यक्षात सहकार पॅनल व विरोधकामध्ये थेट काट्याची‎ लढत होणार असल्याचे चित्र आहे. तर शिंदे गटाने तीन जागे साठी उमेदवार दिल्याने आनखी चुरस वाढली आहे पॅनल‎ वगळून वैयक्तिक मतदारसंघात एका जागेवर‎ १ अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवित आहे‎ हे विशेष. एकंदरीतच या निवडणुकीत चुरस‎ वाढली आहे. पुसद तालुका सहकारी खरेदी-विक्री‎च्या१३ संचालकपदाच्या‎ जागासाठी निवडणुक होत आहे.

मतदारसंघात २३५९ मतदार‎ असून, एकूण १३ संचालक निवडले जाणार‎ आहे त्यामध्ये ५ जागा अविरोध झाल्या. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles