
अपंगांचा पाच टक्के निधी त्वरित वाटप करा
_प्रहार जनशक्ती पक्ष उमरेड तर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन_
प्रतिनिधी नागपूर// नंददत डेकाटे
नागपूर: उमरेड नगरपरिषद अंतर्गत अपंगांचा ( दिव्यांग ) कल्याण पाच टक्के निधी त्वरित वाटप करुन ज्या आशेने उमरेड नगरपरिषद कडे दिव्यांग बंधु आणि भगिनी पाहत आहेत. त्यांच्या भावनांचा आदर करुन त्वरित निधी वाटप करावे.अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष उमरेड तालुक्याच्या वतीने नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले आहे.
सन २०१८ पासून अपंगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधी उमरेड नगरपरिषद ने शासनाच्या नियमानुसार अपंगांना वाटप केला नसुन उमरेड शहरातील अपंगांनी वारंवार नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांना यासंबंधी तोंडी व लेखी तक्रार देऊन सुद्धा नगरपरिषदेने त्यांना तो निधी वाटप केला नसून केवळ थापा देण्याचा काम उमरेड नगरपरिषद करत आहेत.लवकरात लवकर अपंगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात आले नाही तर उमरेड नगरपरिषदेच्या विरोधात मुक्काम मोर्चा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती प्रक्षाचे तालुका अध्यक्ष प्रफुल रामटेके, शहर अध्यक्ष राकेश गणवीर, यांनी दिला.
मोरेश्वर शिवणकर, चिंधु जाधव, रमेश पडोळे पकंज झोडे अमोल जिवणकर गौरी वाघमारे राजु दुधपचारे आदित्य पाटील विठोबा बाकडे,अंकित वाघमारे कांचन मोहीणकर,विजयश्री मोतनकर, प्रिया रेवतकर,अशोक रेवतकर, नामदेव तळेकर, दत्तु सहारकर ,राजेंद्र वंजारी, खुशाल गावतुरे, दिगांबर बोरीकर, संतोष बानकर, मनिषा दोडके ,अमोल तेलरांधे, दिपिका गवळी,नारायण सहारे ,श्रक्षम तांबेकर ,दिपक लोडे आदी उपस्थित होते.