
जुन्या पेन्शनवर तोडगा निघण्याची शक्यता; कर्मचारी संप मागे घेणार?
*राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा*
नागपूर: राज्य सरकारशी आज झालेल्या चर्चेत राज्य कर्मचा-यांच्या संपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. जुनी पेन्शन लागू करावी यासाठी कर्मचारी मागील सात दिवसापासून बेमुदत संपावर होते. आज संपाच्या सातव्या दिवशी राजपात्रित अधिकारी यांनीही संपास पाठींबा जाहिर केला असून, राजपात्रित अधिकारीही संपावर जाणार असल्याने,आज जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत मसुदा अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिले असून संपावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कदाचित आज तास भरानंतर संप मागेही घेण्याबाबत वरिष्ठाकडून सूचना देण्यात येईल. चर्चा यशस्वी झाल्याने संपातून माघार घेण्यात येईल.