
संप
घडविले भविष्य मी सुंदर
स्पर्धा परीक्षेतून ड्युटीवर
केलाय अभ्यास रे भरपूर
कधी सोसली उपासमार!
कामाचा ताण बुद्धीवर
नाही पुरेसा कधी पागर
त्यात उदासीन हे सरकार
नाही पेन्शन आयुष्यभर!
संघटनेने कळविले जरूर
अन्याय हा कर्मचाऱ्यांवर
हिसकावून घेतली भाकर
द्या जुनी पेन्शन लवकर !
बदलले जरी हे सरकार
गळ्यावर टांगती तलवार
कष्टातही भविष्य अंधार
थोडंस दिलं तळहातावर
नाही न्याय हा खरोखर
उचललं शस्त्र हे संपावर
कधी जागणार हे सरकार
द्या जुनी पेन्शन लवकर!
खातो कष्टाचीच भाकर
नाही कुणी केलं उपकार
मिळविणार रे अधिकार
लागला थोडासा उशीर!
आता नाही कधी माघार
ठाम सगळे असे संपावर
जुनी पेन्शन हा अधिकार
नाही कुणास घाबरणार!
देऊ लढा हाच दमदार
यशस्वी आम्ही होणार
आत्मविश्वास जोरावर
एक पाऊल प्रगतीवर!
संपात सहभाग वारंवार!
अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर
======