
धक्कादायक…! दुय्यम निबंध कार्यालयाकडून जमिनीची बोगस खरेदी व्यवहार
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत ग्रामपंचायत हद्दीतील कुठल्याही लेआउट मधील गाव नमुना आठ न घेता बोगस खरेदी करत असल्याचा दावा तक्रारकरत्याने आपल्या तक्रारीत केला आहे.
तक्रारीची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांच्याकडे बोरगडी ग्रामपंचायतीचे सदस्य शरद ढेंबरे यांनी दि.२३ मार्च २०२३ रोजी केली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातून ग्रामपंचायत चा ‘कुठलाही गाव नमुना आठ न घेता परस्पर खरेदी करीत असल्यामुळे ग्रामपंचायतची व शासनाची तसेच प्लॉट धारकांची फसवणूक होत आहे.तक्रारीत प्लॉट खरेदी करीत असताना त्यांनी ग्रामपंचायतीचा गाव नमुना ८ घ्यावयास पाहीजे,परंतु त्या ग्रामपंचायतचा गाव नमुना आठ न लावता ले आऊट मालक वाईंडर व दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला हाताशी धरून बोगस खरेदी व्यवहार करीत आहे.
ज्या ठिकाणी घरे बांधलेली असतांना सुध्दा सदर प्लॉट खाली दाखवुन शासनाची व ग्रामपंचायतची दिशाभुल करीत आहे.लेआउट मालक ले आऊटमध्ये बोगस कामे करून लेआऊट विकसित न करता व ग्रामपंचायतला फेरफार न करता परस्पर खरेंदी करीत आहेत.यामुळे बिल्डरांकडून घर बांधून खाली प्लॉटच्या खरेदी करून शासनाची व प्लॉट घेणाऱ्याची फसवणूक होत आहे.
त्यामुळे सर्व प्रकार गंभीर असून त्याची चौकशी करून संबंधित अधिकारी,वाईंडर व ले आऊट मालकावर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, व दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयाकडे केलेली आहे.संबंधित वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.