
एस.बी.आय. कर्मचा-यांची ग्राहकांशी अरेरावीची भाषा
_धनादेशामागे लेखी लिहून, केली स्वाक्षरी_
नागपूर: राज्याच्या उपराजधानीत एसबीआय बँकेच्या ग्राहकांना अनेकदा कर्मचा-यांचा हकनाक त्रास सहन करावा लागतो, त्यांची अरेरावीही अनेकदा सहन करावी लागते. अशा कित्येक घटना दररोज शहरात कुठल्या ना कुठल्या शाखेत घडत असतात. परंतु याबाबत कुणीही तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाही.
एसबीआय बद्दल भरपूर ऐकले की कामात नेहमी कामचुकार पण होत असते. खूपदा त्यावर जोक्स आणि मीम्स् सुद्धा ऐकलेले आहेत. पण आज प्रत्यक्षात मला त्याचा अनुभव आल्याचे अशोक संग्रामे यांनी सांगितले आहे.
*ते म्हणाले….*
आज कामाच्या गडबडीमध्ये बँकेत जायला थोडा उशीरच झाला.ससर्वांना मार्च एंडिंगची गडबड असते, म्हणून सर्वांचे पेमेंट वेळेवर व्हावे म्हणून गडबड चालू होते. तीन वाजता पार्टी कडून पेमेंट दुसऱ्या व्यक्तीला द्यायचे होते. पार्टीकडे कॅश नसल्यामुळे त्यांनी बेरर चेक दिला. एसबीआय बँकेतील हुडकेश्वर ब्रांचचा. पुढे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे गडबडीतच पावणेचार पर्यंत बँकेत पोहोचलो. तरी चार-पाच लोक होते. पहिल्यांदाच या ब्रांच मध्ये गेल्यामुळे मी काउंटरवर बेरर चेक ठेवला. कुठे टोकन घ्यावे लागेल काय म्हणून विचारणा केले काउंटर वरील व्यक्तीने नाही म्हणून सांगितले. चार लोकांच्या मागे लाईनमध्ये लागलो नंबर आला तर चार वाजलेत
कॅश काउंटर वरील एक महिला कर्मचारी होत्या. लाईनीत उभे असलेल्या चारही लोकांना सुनावत होते आम्ही सकाळी पावणेदहा वाजेपासून होतो दिवसभर कुठे जाता? हीच वेळ भेटते का बँकेत दररोज उशीर करता? अशाच प्रकारे काय ते ग्राहकांना ती महिला सुनावत होती. वाटलं छान स्वागत झालं. लाईन मध्ये उभा असलेल्याना आपल्या हाताने फार मोठी चुकी झाली या भावनेने सर्व उभे होते.
कारण चार वाजत आले होते नंतर माझा नंबर आला समोर चेक दिला मॅडम बोलल्या सोबत आधार कार्डची झेरॉक्स जोडा. मी म्हटलं फोटो id दाखविली तर नाही चालणार काय
त्या संबोधल्या बाजूला सरांना विचारा
पुन्हा सरांना विचारले मी फोटो दाखविली तर नाही चालणार काय ?तर ते म्हणाले नाही झेरॉक्सच लागेल
मी त्यांना बोललो सर आधार ची id दाखवत आहे तर तर झेरॉक्स ची काय गरज आहे? ते नाही आम्हाला ऑडिट ला लागते. मी सर अजून पर्यंत 50000 च्या रकमे करिता pan कार्ड लागतो हा नियम माहित आहे. पण त्या पेक्षा लहान रकमे करिता कितीही रकमे करिता आधार कार्डची झेरॉक्स लागते हा नियम कुठेच वाचला देखील नाही.
ते झेरॉक्सच जोडावी लागेल दाखवून चालणार नाही यावरच कायम होते. मी बर कुठे आहे नियम xerox च जोडावी लागेल id दाखवून चालणार नाही अस असेल तर लिखित द्या म्हणालो. तर,
ते ‘दे तो चेक आणि लिहून देतो ‘ आणि चेकच्या मागे लिहिले आणि लिहिताच 4 वाजलेत काउंटर बंद करा
असे संबोधले. मी चेक घेतला व मोबाईल मध्ये फोटो घेतला. मी पुन्हा कॅश कॉउंटरवर आलो आणि आधार दाखवून मैडम ला चेक दिला पुन्हा तेच उत्तर आधारची झेरॉक्स जोडा व चेक परत केला मी पुन्हा न राहवून बोललो बेरर चेक सोबत आधार जोडायचं असतो हे फलकावर तरी लिहायचे दर्शनी भागावर त्यावर तेच सर बोलले जर असे नियम बँकेत लिहिले तर बँकेची एकही भिंत शिल्लक राहणार नाही? तुम्हाला काय करायचे ते करा मघाशी फोटो घेतलाच तुम्हाला जे करायचे ते करा.
सर्व लोक आमच्याकडे बघत होते. मी शेवटी फक्त sbi चे कर्मचारी असे असतात अस ऐकलं होत आज बघतले देखील असे बोलून शेवटी बँकेतून बाहेर आलो. अशोक संग्रामे यांना आलेला अनुभव शहरातील अनेकांना आला असून, मुजोर कर्मचा-यांना कुठेतरी चाप लावणे गरजेचे असून, बँकेने असे काही नियम काढले असल्यास ते जनहितार्थ सूचना फलकावर लिहणे अनिवार्य आहे.