
चुकीच्या वाहन पार्किंगचे फोटो पाठवा; ५०० रू बक्षीस मिळवा; नितीन गडकरी
_एक हजार रूपये दंडात्मक कारवाई_
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे होणाऱ्या जॅमपासून सुटका करण्यासाठी गडकरींनी नवी घोषणा केली आहे. जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवला तर त्याला ५०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे गडकरींनी सांगितले.
गडकरींनी केलेली ही घोषणा ऐकून कार, दुचाकी आणि इतर वाहनचालकांसह सर्वसामान्यांनाही धक्का बसला. हा कायदा लवकरच आणण्याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर शहरांतील ट्रॅफिक जामपासून दिलासा मिळणार आहे. चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करण्याची सवय थांबवणे हा हा कायदा आणण्याचा उद्देश असल्याचे गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. ते त्यांच्या भाषणात म्हणाले, ”मी एक कायदा आणणार आहे – त्यानुसार जो कोणी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करेल, त्याला १००० रुपये दंड आकारला जाईल. याशिवाय चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवणाऱ्याला ५०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल.”
लोक करोडोंची घरे बांधतात यावर केंद्रीय मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र पार्किंगचा विचार त्यांच्या मनातही येत नाही. कोट्यवधींचे घर आणि लाखो कोटींची कार खरेदी केल्यानंतर ते वाहन रस्त्यावरच पार्क करतात. गडकरी म्हणाले, ‘माझ्या स्वयंपाकीकडे नागपुरात दोन जुन्या गाड्या आहेत. आज चार जणांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. यावरून असे दिसते की दिल्लीतील लोकांची वाहने उभी करण्यासाठी आपण रस्ता बनवला आहे.