
➿➿➿➿🌷📕🌷➿➿➿➿
*मुक्तच्छंद काव्य रचना अशी असावी*
➿➿➿➿🌷📕🌷➿➿➿➿
*✍️छंदोरचनेच्या अनेक बंधनातून मुक्त असलेली कवितेची रचना म्हणजे मुक्तच्छंद काव्यरचना.*
*🔹मुक्तच्छंद हा काव्यप्रकार अक्षरे, गण, यति, मात्रा या छंदोरचनेतील बंधनापासून मुक्त असतो.*
*🔹आशयानुसार परिच्छेद असतात. नुसत्या ओळी तोडून लिहिणे म्हणजे मुक्तच्छंद नव्हे. तर मुक्तच्छंदालाही एक अंतर्गत लय असते. आणि ही लय वाचकाला वाचत असताना सतत जाणवत रहाते/जाणवली पाहिजे. यासाठी कर्ता, कर्म, क्रियापद अशी वाक्यांची रचना नसावी. क्रियापदाने ओळीचा समारोप करणे टाळावे. एक ओळ संपत असतानाच विचाराची दुसरी ओळ त्यात गुंफत जाऊन तो विचार जोडत गेल्यासारखं वाचकाला वाटलं पाहिजे.*
*🔹विचारानुसार वाक्यरचना असल्यामुळे चरण संख्येला किंवा ओळीना मर्यादा नसते. कल्पना, विचार, भावना पुरी झाली की कडवे संपते.*
*🔹मुक्तच्छंद हा लयबद्ध रितीने व संथपणे वाचायचा असतो.*
*🔹प्रौढ किंवा गंभीर भावना व विचार व्यक्त करण्यास मुक्तच्छंद उपयुक्त आहे. जगात मान्यताप्राप्त व सर्वदूर जास्त प्रमाणात हा काव्यप्रकार वापरला जातो.*
*🔹वैचारिक, सामाजिक, चिंतनशील दीर्घ काव्य रूप हे गेय कवितेतून प्रभावीपणे मांडण्यासाठी मर्यादा येतात म्हणूनच त्याला प्रभावी असा मुक्तच्छंद काव्यप्रकार आहे.*
*🔹मुक्तच्छंदात कविता लिहिणे वाटतं तितकं सोपही नाही. मुक्तच्छंदाची कविता गद्यसदृश्य होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. परंतु पूर्वी सुरींच्या किंवा आत्ताच्या समकालीन अनेक कवींच्या मुक्तच्छंदातील कवितांचा अभ्यास करून आपण आपला मुक्तच्छंद कवितेचा अभ्यास करू शकतो.*
*✍️’मराठीचे शिलेदार’ समूहातील मान्यवर कवींच्या किंवा सोशल मिडियावरच्या समकालीन कवींच्या चांगल्या मुक्तच्छंद रचना आपण अभ्यास म्हणून वाचल्या पाहिजेत असं आम्हाला वाटते. मागील ४ वर्षातील सर्व काव्यरचना आमच्या समूहाच्या ‘काव्यसंपदा’ या फेसबुक पेजवरही प्रसारित केल्या आहेत. त्याचाही अभ्यास आपण करू शकता.*
*©सौजन्य:मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌷📕🌷➿➿➿➿