प्रेमाने जग जिंकता येतं…!!;सुधा मेश्राम

➿➿➿➿🔵🔷🔵➿➿➿➿पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌍प्रेमाने जग जिंकता येतं…!!*

➿➿➿➿🔵🔷🔵➿➿➿➿

*प्रज्ञा शिल करूणा करा, महिमा तुझा अपार*
*युगंधरा क्रांतीविरा, वंदन तुजला त्रिवार*
*विश्वशांतीचा मार्ग, जो बुद्धांने दिधला*
*त्या बुद्धांचा धम्म ,जगी या वंदनिय ठरला…*

*🙏 शनिवार काव्यस्तंभ स्पर्धेचा विषय ‘ शांतीचा मार्ग’ राहुल भाऊंनी दिला सर्वप्रथम आठवले ते विश्वशांतीचा संदेश देणारे महाकरूणाकार तथागत गौतम बुद्ध आणि येथूनच माझे विचारचक्र सुरू झाले व गायक शिंदेच्या या ओळी आपसुकच माझ्या ओठातून गुणगुणायला लागल्या. तथागतांनी सांगितले आहे प्रेमाने जग जिंकता येतं. पंचशील आणि अष्टांग मार्गाचा जो मनापासून पालन करील त्याचे जीवन हे सुखमय आंनदात जाईल. प्रशा,शील करूणा, मैत्री हे गुण अंगीकारले पाहिजे.*

*🎍काया, वाचा, मनाने कोणतेही पाप मनात येणार नाही. आपल्याला जर दुस-यांचे मन जिंकायचे असेल तर; आधी रांगावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. आपला विनाश करणारा सर्वात मोठा शत्रू तो म्हणजे क्रोध. राग म्हणजे जळता कोळसा दुस-यावर फेकण्यासारखे आहे. हाच राग तुम्हाला जाळतो. रागाने मनात द्वेषाची भावना, माझ्यापेक्षा कुणीही वरचढ नाही ही अहमपणाची बाब निर्माण होते. तो व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्याच्या वाणीतून नेहमी कटु बोल निघतात.ते बोल व्रणापेक्षाही मनाला वेदना देणारे ठरते आणि उलट तो इत-यांच्या नजरेतून खाली उतरतो. रागामुळे सर्व क्षणात नष्ट होते म्हणून रागावर नियंत्रण असणे जरूरीचे आहे.*

*🧘‍♀️यासाठी मनाला शांती देणारे तथागताचे विचार आत्मसात केले तर आपल्या विचारांवर परिवर्तन होऊन आपण आपले जग निर्माण करू शकतो. यासाठी स्वतःवर विश्वास असायला हवा. आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता, काय करू शकतो यावर अधिक भर द्या. वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. शांतता ही कुठेही बाहेर मिळत नाही तर ती नेहमी मनातून येत असते. रागावर सर्वात साधा, सरळ उपाय तो म्हणजे मौन धारण करणे म्हणजे ध्यानस्थ बसणे यालाच विपश्यना म्हणतात. जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. अज्ञान आणि गोंधळामुळे आपण प्रश्नांच्या उत्तरापर्यत पोहचू शकत नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मौन धारण तसेच परिस्थिती समजून घेतली पाहिजे तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील.*

*😊एवढेच सांगावेसे वाटते कि,चांगले विचार अंगिकारा,ज्ञान संपन्न करा, रागांवर नियंत्रण ठेवा, आणि छोट्या छोट्या गोष्टीतही इतरांसोबत आंनद वाटा शिका..*

*🌼हे विचार मनात ठेवून मी ‘शांतीचा मार्ग ‘लेखणीला सुरवात केली आणि ती परिक्षकांच्या मनास भावली आणि सर्वोत्कृष्ट यादीत मानाचे स्थान दिल्याबद्दल मी सर्व प्रथम आमचे आधारवड,कल्पतरू दीपस्तंभ, आ राहुल भाऊ पाटील तसेच सचिव पल्लवीताई पाटील यांच्या सदैव ऋणाईत….🙏🙏🙏 भाऊ बद्दल काय बोलावे शब्द सुद्धा अपुरे पडतात. कारण कार्य त्यांचे महान आहेत. पाच सात दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नाही ताप ,सर्दी, खोकला याने ग्रस्त असून जेव्हा फोनवर त्यांचा आवाज ऐकला तेव्हा मला धक्काच बसला आवाज एकदम बसला होतो गळ्यात इन्फेक्शन झाले होते. तरी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न बाळगता आमच्या चेह-यावर सदा हसू पाहण्यासाठी कविता, चारोळी, चित्र चारोळी, हायकू स्पर्धा, तसेच साप्ताहिक साहित्यगंध’ तसेच दैनंदिन सर्वोत्कृष्ट पोस्टर देत असतात.त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू असते. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठ, कार्यकुशलतेला माझा त्रिवार वंदन…🙏🙏🙏*

*😞एवढ्या कठिण परिस्थितीही स्पर्धा घेऊन आंनदाची पर्वणी आम्हाला देतात आणि आम्ही काय करतो साधा निकालही वाचत नाही सन्मानपत्राकडे पाठ फिरवितो हीच मोठी खेदाची बाब आहे. मला एवढेच आवर्जून सांगावेसे वाटते की, सारस्वतांनो तुम्ही लिहता तसेच निकाल वाचनाकडे दुर्लक्ष करू नका फोटो पाठवत चला… आमच्यासाठी ते एवढी मेहनत घेतात तर आपणही थोडा सक्षमीकरणासाठी हातभार लावू या चला तर मग साहित्यगंधासाठी लेख, कविता,समिक्षण, चारोळी पाठवू या…*

*🌸माझ्या बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत माझ्या ‘हाफ टिकीट’ या काव्य रचनेला तसेच शुक्रवारीय हायकू काव्य रचनेला सन्मानित केल्याबद्दल तसेच आज माझ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने राज्यस्तरीय कविसंमेलनात सादर केलेली काव्यरचना ‘आजचा युवा’ याचे चलचित्रकरण फेसबुक आणि बिनधास्तन्युज चॅनवर प्रसारित केल्याबद्दल समुहातील आ प्रशासक आ. सहप्रशासक, आ.परिक्षक, तसेच मराठीचे शिलेदार संपूर्ण टिमचे दिलोजान पूर्वक आभार…🙏*

➿➿➿➿🔵🔷🔵➿➿➿➿
*🙏आपलीच ताई*

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार*
➿➿➿➿🔵🔷🔵➿➿➿➿

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles