
मन
मनाचा मनाशी
नित्य झाला वाद
तर नात्यातला
हरवतो संवाद
मनाने मनावर
करू नयेत वार
कधी कधी शब्दांना
शस्राहुनी असे धार
मनाने मनावर
करू नये आघात
कठीण प्रसंगीही
सोडू नये साथ
मनाचे मनाशी
जपले जर अनुबंध
नात्यातला हरवत नाही
कधीच मधु गंध…
यमुताई ब्राम्हणकर
अर्जुनी/मोर.गोंदिया