सत्तेच्या बाजारात पैसा झाला खोटा….!;वैशाली अंड्रस्कर

सत्तेच्या बाजारात पैसा झाला खोटा….!;वैशाली अंड्रस्कर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*मराठीचे शिलेदार समूहातील शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचा विषय ‘पैसा झाला खोटा’ हा विषय बघताच आपोआपच मन बालपणात गेले आणि…*

*ये रे ये रे पावसा*
*तुला देतो पैसा..*
*पैसा झाला खोटा*
*पाऊस आला मोठा*

*हे बालगीत गुणगुणत खोट्या खोट्या पावसात अंग भिजवत नाचूनही आले. नंतर जरा भानावर येताच कळले…अरे हा तर पाऊसही खोटा आणि पैसाही खोटाच. आपण या पावसाला बालपणी खोटा पैसा देऊन फसवले पण हाच खोटा पैसा भविष्यातही तोटा आणेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.*

*बुमरॅंग सारखा आपला डाव आपल्यावरच उलटला. राजकारण, समाजकारण करणाऱ्यांच्या टोळ्यांनी सर्वसामान्य जनतेला पैशाचे आमिष दाखवून अंकित करण्याचा प्रयत्न केला. गरजेच्या पोटी म्हणा अथवा जगण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी म्हणा…या आमिषाला भोळी भाबडी जनता बळी पडू लागली आणि सत्तेच्या बाजारात त्यांच्या नशिबी पैसा खोटाच ठरू लागला. कारण मतांचा पाऊस जरी लोकांनी भरभरून पाडला तरी मोबदल्यात जीवनावश्यक योजना, सोयीसुविधा अशा आश्वासनांच्या परिपूर्तीचा पैसा मात्र खोटाच ठरला.*

*मुख्य प्रशासक माननीय राहुल पाटील यांनी विषयासोबत एक तळटीप दिली होती… एप्रिल फूलच्या निमित्ताने रचनांची मांडणी करावी. त्या अनुषंगाने अनेक रचना आल्या. सामाजिक आणि राजकीय पटलावर आढळून येणारा कथनी आणि करणी यातील विरोधाभास ठळकपणे शिलेदारांनी आपापल्या शब्दांमधून व्यक्त केला. त्याचबरोबर हलक्याफुलक्या विनोदी रचनांनी एप्रिल फूल दिवस सार्थकी लावला.*

*काव्यस्तंभ स्पर्धेत अव्वल ठरलेल्या रचनांपैकी बी. एस. गायकवाड, पालम, जिल्हा – परभणी यांनी ऐतिहासिक माहिती सोबतच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘द प्रॉब्लेम ऑफ द रूपी’ ग्रंथ, भारतीय रिझर्व्ह बँकेची १ एप्रिल १९३५ रोजी झालेली स्थापना अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या रचनेमधून सुबकपणे मांडली. तर मंगेश पैंजणे, मानवत, जिल्हा – परभणी यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची मालिका आणि आश्वासनांची खैरात ऐकता ऐकता पैसा कसा खोटा होत गेला याचे ह्रदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. सर्वांच्याच रचना विषयाला न्याय देणाऱ्या होत्या. शब्दमर्यादे मुळे इथे उल्लेख करता येत नाही. त्याबद्दल क्षमस्व.*

*लिहित राहा, व्यक्त होत राहा….साहित्यविश्व आपले अनुभव आणि लेखणीने व्यापत राहा… सर्वांना भरभरून शुभेच्छा….!*

*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles