पिंपळगाव इजारा ते आमटी रस्त्याची दुरुस्ती करा मनसेची मागणी

पिंपळगाव इजारा ते आमटी रस्त्याची दुरुस्ती करा मनसेची मागणीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: हिवाळी तलाव पिंपळगाव इजारा ते आमटी येथील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने उपअभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद कार्यालय पुसद यांना आज दिनांक २९ मार्च २०२३ रोजी निवेदन देण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील माळपठार हा ग्रामीण असलेला भाग हा नेहमीच अविकसित राहिलेला आहे.या भागात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.शहरी भागास् व मुख्य रस्ते जोडलेले आहे तर ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची आजही दयनीय अवस्था आहे.
आपल्या भारत देशामध्ये शहरांचा विकास व खेडे मात्र अजूनही विकासापासून भकास अशीच अवस्था झालेली आहे ग्रामीण भागात आजही रस्ते नसल्याने रस्ते निर्माण व दुरुस्तीसाठी नेहमीच आंदोलन मोर्चे व निवेदन द्यावे लागतात त्याचाच भाग म्हणून आज दिनांक २३ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुसद तालुका शाखा यांच्या वतीने हिवळणी तलाव, पिंपळगाव इजारा ते आमटी हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.
या रस्त्यावर ये जा करणाऱ्याना फार मोठी कसरत करावी लागत आहे. याच रस्त्यावरून मालवाहतूक शालेय विद्यार्थी, तसेच ज्येष्ठ नागरिक, राज्य परिवहन मंडळाची बस, शेतकऱ्यांची मालवाहतूक इत्यादींना आपला जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते, या सर्व बाबी लक्षात घेऊन येथील रस्त्याचा वापर होत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? हा मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकाच्या दृष्टीने या रस्ता दुरुस्ती करून नवीन रस्ता निर्माण करण्यात यावा करिता उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी लवकरात लवकर या भागाकडे लक्ष द्यावे या करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास मनसेला आपल्या स्टाईलने ने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची प्रशासनाने दखल घ्यावी.
निवेदन देते वेळेस प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुसद तालुका अध्यक्ष गजानन लांडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष आकाश रहाटे, तालुका उपाध्यक्ष रवी सूर्य, महेश आर्य, भाऊसिंग राठोड, अभिषेक वंजारे, इत्यादी निवेदन वेळेस उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles