‘एप्रिल फूल बनाया; तो उनको गुस्सा आया’

‘एप्रिल फूल बनाया; तो उनको गुस्सा आया’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

फूल म्हटलं की त्याचा रंग, गंध मनाला भुरळ घालतो. फूल झाडाला असले, तर हात लावायचा मोह होणारच. असं हे फूल कुणीही कुणाला दिलं तर आनंदच होणार. पण काल एक तारीख असे एक फुल उमललं आणि त्याच्या वासाने खुश व्हायचं सोडून ज्यांना ते दिलं त्याला नटखट. कश्मीर की कली सायराबानू सारखा गुस्सा आला हे कळलं असेलच ना. ‘एप्रिल फूल बनाया, उनको गुस्सा आया’ असं म्हणणारा या ‘एप्रिल फुल’ चा नायक विश्वजीत हा सायरा बानूची समजूत काढतो.. पण ती ऐकत नाही. 1964 साली आलेल्या ‘एप्रिल फूल’ या चित्रपटातलं हे गीत आणि हा चित्रपट एक गमतीदार विनोद निर्मिती करून प्रेक्षकांची मन रिझवून गेला. ‘मेरा क्या कसूर जमाने का कसूर, जिसने दस्तूर बनाया’.

सुप्रसिद्ध गीतकार “हसरत जयपुरी” यांचे हे खुसखुशीत शब्द आणि त्याला संगीत देऊन “शंकर-जयकिशन”हे गीत खूपच रंजक बनवतात… अल्लड विश्वजीत यांच्यासाठी मोहम्मद रफी यांनी हे गीत गाताना त्याची नजाकत या शब्दात ओतली. त्यामुळे हे गीत प्रत्येकाच्या ओठी रेंगाळत राहीलं. एप्रिल फूल बनवणे म्हणजे एखाद्याला खोट खोट लटक फसवण. हे अनुभवायचं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला असं लटकं लटकं फसवायचं… रागवायचं . हा माझा दोष नाहीच मुळी… अर्थात असा लटका राग जेव्हा येतो तेव्हा, ‘गुस्से के रूप मे लगती हो और हसीन, तेरी कातिल अदा ने मार डाला’ असं म्हटल्यावर कोणाला हे फुल आवडणार नाही. मनातून तर आवडत असणार आणि अशा या लुटूपुटूच्या रागातून कधी प्रेम जुळून येतं हे कळतही नाही.

दिल मे दिल की पहचान हुई
जागी मोहब्बत गाने लगे जिंदगी

मोहब्बत, प्रेम यातून एप्रिल फूल सुगंधी होणारच. हे गीत कालपासून प्रत्येकाच्या ओठी रेंगाळत असेल. बऱ्याच जणांना तुम्ही हे एप्रिल फूल दिल असेल आणि हलका हलका… लटका लटका….. गुस्सा शांत करायला सांगताना म्हणत ही असाल की.. मेरा क्या कसूर, जमानेका दस्तूर..
तब्बल एक महिना आपण हे गीत अधून मधून गात राहून जीवनात विनोद निर्मिती करत तणावापासून मुक्त होऊ या… अर्थात जरी ‘ओल्ड इज गोल्ड.’ असं या गाण्याच्या बाबतीत म्हणता येणार नाहीच. कारण जोपर्यंत एप्रिल महिना येईल तोपर्यंत हे फुल असंच सुगंधित टवटवीत आणि विनोद निर्मिती करत राहणार. तुम्ही ही गात राहणार…!!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles