
हिशोब
सुख दुःखाचा मेळ लागेना
किती पाप आणि किती पुण्य
हिशोबा अंती चुक कळाली
वजा बेरीज उरला शुन्य
मिळाला मानवी देह आपणा
चला करू या सत्कर्म सारे
नाही घडले तरीही चालेल
पण कुकर्म तरी करू नका रे
एकमेका साह्य करूनी
अवघे धरू सुपंथ सारे
माणुसकीला जपण्यास्तव
दीनदलितांना हात द्या रे
करू नये फसवणूक कुणाची
समजून जो सद्बुद्धीने वागे
या जन्मी या देही त्याच्या
आयुष्याचा हिशोब लागे
आयुष्याचा हिशोब लागे
प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर
जि. चंद्रपूर