
बाप
मुलगा जन्मला सुंदर
आनंदी सदा विचार
बाप पाठीशी खंबीर
हौस पुरवितो दमदार!
दिला शब्द पाळणार
वचनाला तो जागणार
मनात सदा झुरणार
ओळखतो दुःख जरूर!
बाप असतो शिल्पकार
सहन करी विनातक्रार
फोडतो कष्टाने डोंगर
घडवितो हा चमत्कार!
कर्ज किती डोक्यावर
अर्धा संसार उघड्यावर
मानपान तो जपणार
भरोसा हा भविष्यावर!
प्रेमानं करतो नमस्कार
चालतो योग्य मार्गावर
दूरदृष्टी सदैव आरपार
देवाची कृपा संस्कार!
जपतो संस्कृती निरंतर
नको आसवांची धार
झेलतो वार छातीवर
राब राबतो शेतावर !!
बाप हा बाप असतो
आईचा खरा आधार
ओझं घेई रे खांद्यावर
बापाचा करावा आदर!!
अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर