
भ्रमाचा भोपळा
स्वतःपेक्षाही विश्वास
ज्याच्यावर असतो,
तोच,आपली खात्रीशीर
फसगत करत असतो.
वेळ येते संकटाचीं
तेव्हा याचना मदतीची,
भ्रमाचा भोपळा फुटतो
पारख होते नात्यांची.
भ्रमनिरस होतो
विश्वासघात झाल्यावर,
कसा ठेवायचा भरोसा
या,बेगडी नात्यावर.
जवळचे अन दूरचे
ओळखावेत पारखी नजरेने,
काम झाले की लांब होणारे
हेरावेत सारे,दूरदृष्टीनें.
ठेवावा विश्वास जरूर
दाखवू नये अविश्वास,
वेळच सांगते सर्वांना
हा, भास की अभास.
गरज सरो अन,वैद्य मरो
म्हणणारे असतात सारे,
उपकाराची परतफेड
ओळखू,अपकाराने करणारे.
आपटशील जोरात
विश्वास ठेव स्वतःवर
उठताही येणार नाही
दगा फटका झाल्यावर.
मायादेवी गायकवाड
मानवत, जि.परभणी
=======